मौजे आंबेत येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरू करावे या करिता भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुका यांच्या वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
मौजे आंबेत येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरू करावे या करिता भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुका यांच्या वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
म्हसळा तालुक्यातील मौजे खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने मोफत कोरोना रोग प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केले आहे परंतु मौजे आंबेत, संदेरी, फळसप व लिपनी वावे या गावातील नागरिकांना शासनाची मोफत लस घेण्याकरिता ३०० ते ४०० रुपये भाडे द्यावे लागत असल्याने गरीब व आदिवासी समाजातील नागरिकांना लस घेण्यापासून वंचित राहत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केंद्र सुरू असून या परिसरात ३५ पेक्षा जास्त प्रमाणात कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी तालुका उपाध्यक्ष भाजपा श्री प्रसाद विचारे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या मागणी नुसार मौजे आंबेत येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आज मंगळवार दिनांक ११ मे २०२१ रोजी मा. तहसीलदार यांच्या कडे म्हसळा तालुका भाजपाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे सदर प्रसंगी उपस्थित तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस श्री सुनील शिंदे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री सुबोध पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment