# लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500 रु. # महिला व बालविकास मंत्री आदितीजी वरदा सुनिल तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण.
# लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500 रु.
# महिला व बालविकास मंत्री आदितीजी वरदा सुनिल तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण.
# लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक योजना असून ती कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी तात्काळ आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे श्रीवर्धन मतदार संघाच्या लाडक्या आमदार व महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीजी तटकरे यांनी हातातील समय म्हणजे "घड्याळा"कडे बघत आपले मत "रायगड मत" कडे व्यक्त केले.
रायगड मत / जितेंद्र नटे
अनेक महिलांच्या संसाराला हातभार लावण्याचे पुण्याचे काम करणारी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या लाडक्या महिला मंत्री आदितीजी तटकरे यांनी आणली. महिन्याला मिळणारे थोडेफार पैसे हे पैसे नसून महिलांच्या हक्काची मदत झाली आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील महिला या योजनेचे सारे श्रेय आपल्या लाडक्या मंत्री आदिती तटकरे यांना देतात. दिवस रात्र एक करून त्यांनी ही योजना आणली, टिकवली आणि सरकारही वाचवले. त्यामुळे महिला वर्गातून त्यांचे आभार मानले जातात. त्या जरी अजून संसाराला लागलेल्या नसल्या तरी त्यांच्यामुळे अनेकांच्या संसारात सुखाचे दिवस आले आहेत. या पुण्याचे कामाचे फळ मुंबादेवी त्यांना नक्कीच देईल, असे आशीर्वाद महिला देत असतात. कुणाची मुलांची शाळेची फी, कुणाचा ईएमआय, कुणाचा राशन भरायला थोडीफार मदत होते, यापेक्षा अजून काय पाहीजे. कधी कधी माणसाची परिस्तिथी अशी येते कि कोण 500 रु. ची पण मदत करत नाहीत. अश्यावेळी आपली आदिती आपल्याला हक्काचे पैसे देणार म्हणून अनेक महिला वाट बघत असतात. यावेळी एकदम 4500 रु. मिळणार म्हणजे एखाद्याच्या घरात जर 2/3 महिला असतील तर त्यांच्याकडे 15 हजार सारखी मोठी रक्कम एकत्र आली तर नक्कीच त्या घरातील एखादी मोठी वस्तू विकत घेऊ शकतात किंवा आपले छोटे, मोठे कर्ज फेडू शकतात. त्यामुळे ही योजना फार महत्वाची आहे. सगळी सोंग जमतात पण पैशाचे सोंग जमत नाही. त्यामुळे या योजनेची महती फार मोठी आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यात 1500 रूपये मदत मिळते. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा थेट असा झाला की, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता न आल्याने काही महिलांमध्ये नाराजी बघायला मिळाली. आता लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची तितकेच आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता थेट 4500 रूपये मिळणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत.
भविष्यात लाडक्या बहिणींनी 2100 रूपये प्रतिमहिन्याला हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 हून 2100 मिळणार असल्याचे सांगितले जाते. त्यामध्येच आता थेट तीन महिन्यांचा राहिलेला हप्ता लाडक्या बहिणींना एकदमच मिळणार आहे. काही महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे तर अनेक महिलांचा तीन महिन्यांचा हप्ता राहिल्याचे सांगितले जात आहे तो एकदमच मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही उलट या योजनेचे अजून पैसे वाढतील. ही योजना निरंतर सुरू राहणार आहे. सरकारने केवळ महिलांना दरमहा मदत करणेच नव्हे, तर त्यांना भविष्यात ‘लखपती दीदी’ करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे.
लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक योजना असून ती कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी तात्काळ आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे श्रीवर्धन मतदार संघाच्या लाडक्या आमदार व महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीजी तटकरे यांनी हातातील समय म्हणजे "घड्याळा"कडे बघत आपले मत "रायगड मत" कडे व्यक्त केले.



Comments
Post a Comment