# समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे म्हणजे समाजसेवेचा वाहत झराच होय. # शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्याना वाटप केले मोफत शासकीय दाखले...

# समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे म्हणजे समाजसेवेचा वाहत झराच होय. # शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्याना वाटप केले मोफत शासकीय दाखले... पनवेल : जितेंद्र नटे / रायगड मत गेली अनेक वर्षे खांदा कॉलोनी येथील रहिवाशी असणारे आणि येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जाणारे समाजसेवक अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी नगरसेवक श्र. शिवाजी साहेबराव थोरवे होय. पनवेल मधील गजबजलेल्या खांदा कोलनीत सर्व धर्म सर्व जातीतील लोक राहत आहेत. मात्र या लोकांनाच आपले शासकीय दाखले, विध्यार्थ्यांच्या शाळेत लागणारे दाखले काढणे म्हणजे जिकरीचे काम असते. अनेक वेळा तहसील कार्यालय किंवा अन्य कार्यालयात हेलपाटे घातले तरी काम होत नाही. लोकांची हीच समस्या हेरून माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांनी निशुल्क म्हणजे काहीही पैसे न घेता काम करायचे ठरवले. गोर गरीब जनतेची सेवा करायची त्यांच्या आई वडिलांनी समाजसेवेची दिलेली शिकवण ते नेहमी जपत आलेले आहेत. अशातच त्यांनी खांदा कॉलोनी येथे भगवा सप्ताह म्हणून १९जुन ते १९ जुलै असे ३० दिवस ३० कार्यक्रम राबवला आहे. नुकतेच त्यांनी खांदा क...