अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे जाऊन घेतली भेट

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे जाऊन घेतली भेट अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावे गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत. मैथिलीच्या अकाली जाण्याने न्हावे गावासह संपूर्ण पनवेल, उरण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. चार दिवसांपूर्वीच मैथिली ही आजारी असल्यामुळे घरी आली होती. त्यानंतर बुधवारी ती अहमदाबादला जाण्यासाठी निघाली. अपघाताच्या अवघ्या अर्धा तास आधी तिने आई-वडिलांशी फोनवरून संवाद साधून लंडन प्रवासाबद्दल कल्पना दिली होती तसेच लंडनला पोहचल्यावर फोन करते, असे सांगितले. तिचे हे संभाषण अखेरचे ठरले. तिच्या दुर्दैवी मृत्युमुळे दुःख व्यक्त होत आहे. न्हावे येथे पाटील कुटुबियांच्या सांत्वनपर भेटीवेळ...