Posts

Showing posts from May 21, 2025

प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Image
  प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप,  नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी गटार या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.       याप्रसंगी मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत  बबन मुकादम (मा. नगरसेवक), श्री. तानाजी पाटील (सरपंच), श्री. चंद्रकांत भोईर ( मा.सरपंच), श्री. अविनाश गाताडे ( विभागीय अध्यक्ष), श्री. मंगेश वाकडीकर (तालुका अध्यक्ष), श्री. तानाजी खंडागळे, श्री. प्रविण ठाकूर, श्री. गणेश गाताडे (मा.उपसरपंच), कुं. रोहित घरत (मा. उपसरपंच), श्री. दिपक ठाकूर, श्री. अरुण पाटील, श्री. अनिल काठावळे, श्री. किरण मुकादम, श्री. स्वप्निल भोईर, श्री. महेंद्र गोजे, श्री. रुपेश ठाकूर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.