# एक सामान्य कार्यकर्तासुद्धा भाजपा मध्ये जिल्हाध्यक्ष होऊ शकतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भाजपा मोठं केल्याशिवाय राहत नाही. इथे घराणेशाही नाही. म्हणूनच रायगड जिल्ह्यात भाजपा वाढत चालली आहे. # अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनःश्च निवड.

# एक सामान्य कार्यकर्तासुद्धा भाजपा मध्ये जिल्हाध्यक्ष होऊ शकतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भाजपा मोठं केल्याशिवाय राहत नाही. इथे घराणेशाही नाही. म्हणूनच रायगड जिल्ह्यात भाजपा वाढत चालली आहे. # अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनःश्च निवड. पनवेल (प्रतिनिधी) अविनाश कोळी एक सामान्य माणूस, सामान्य पत्रकार, तर कधी RSS चा प्रामाणिक सैनिक. कुठलाही राजकीय वरदहस्त नाही. की कुठलाही मोठा धंधा नाही. साधारण पणे जिल्हाध्यक्ष पद हे 100 कार्यकर्ते मागे आणि 100 कार्यकर्ते लोंबते असलेल्या माणसाला देतात. पण तसें काही नाही. केवळ मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे मिशन फत्ते केले आहे. अनेक वर्षे भाजपा साठी त्यांनी घासली आहेत. त्या नंतर ते जिल्हाध्यक्ष पदी आले. त्यानंतर ही कसोटी असते इलेक्शनला. इलेक्शन हरले की डचू असतोस. पण त्यांनी खासदारकी आणि आमदारकी यामध्ये जान ओतली. नशिबानेही साथ दिली. एवढे कमी की काय महाबली जे. एम. म्हात्रे आणि महाबलाढ्य प्रितम जनार्दन म्हात्रे यांना सुद्धा भाजप पक्षात आणण्यात यश मिळवले. बाकी राजकारण काही असेल ते पण जिल्हाध्यक्ष तेच होते ना. त्यामुळे य...