Posts

Showing posts from May 31, 2025

शनिवारपासून पनवेलमध्ये भव्य 'कीर्तन महोत्सव'

Image
  शनिवारपासून पनवेलमध्ये भव्य 'कीर्तन महोत्सव'  पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमे आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संताच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात अध्यात्मिक सोहळ्याने शनिवारपासून कीर्तन महोत्सवातून होणार आहे. त्यानुसार दिनांक ३१ मे ते ०२ जून पर्यंत खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने तीन दिवस भव्य स्वरूपात 'कीर्तन महोत्सव' होणार आहे.             लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात ओळखले जातात. त्यांचे सर्व क्षेत्रातील योगदान नेहमीच आदर्शवत राहिले आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन व अर्थसहाय्य केले आहे, त्याचबरीबरीने अध्या...