Posts

Showing posts from May 26, 2025

... पुन्हा कारवाईला आल्यास जशास तसे उत्तर चुकीच्या माहितीने सिडकोने केली न्यायालयाची दिशाभूल # आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर

Image
कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध; जनआं दोलनामुळे सिडको रिकाम्या हाती माघारी  ... पुन्हा कारवाईला आल्यास जशास तसे उत्तर  चुकीच्या माहितीने सिडकोने केली न्यायालयाची दिशाभूल  आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर   पनवेल (प्रतिनिधी) दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरांगत असलेल्या उलवे नोड मधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे रिकामे हाती परतावे लागले असून पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी कोपर स्मशानभूमी बचावासाठी आज जनआंदोलन उभारले. विजेचा कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलक मागे हटले नाहीत. या आंदोलनालाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे येत कारवाईला हात लावला नाही. मात्र कारवाई केल्यास आम्ही पण तयार आहोत ...