Posts

Showing posts from May 23, 2025

स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची कॅबीनेट मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली भेट

Image
स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची कॅबीनेट मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली भेट रायगड मत / प्रतिनिधी स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची घेतली भेट. ही घटना अत्यंत वेदनादायक असून एक संवेदनशील मुलगी अन्यायाच्या सावटाखाली आयुष्य गमावते, यासारखं दुसरं दुःख नाही. या कठीण काळात कस्पटे कुटुंबाच्या पाठिशी मी व महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीनं उभं आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, ही आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ज्या व्यक्तींनी तिच्यावर अन्याय केला, त्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होणार नाही. असे वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले. तसेच वैष्णवीचे बाळ सुखरुप असणं गरजेचं आहे, त्यासाठी बाळाची चांगल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी घ्यावी. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे ह्या घटनेवर बारकाईने लक्ष असुन पिडीत कुटुंबियांना आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ. या दु:खद भेटीप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, श्रीमती वैशाली नागवडे, श्री.नाना काटे, श्रीमती ...