लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोमसापतर्फे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोमसापतर्फे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन कविसंमेलन,परिसंवाद ,सन्मान पुरस्कार,अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन पनवेल(प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन परिसंवाद,सन्मान पुरस्कार, अभिष्टचिंतन सोहळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ जून २०२५ रोजी पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या या साहित्यिक कार्यक्रमांमध्ये दुपारी २ वाजता कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनासाठी कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपर्कप्रमुख रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व... या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादामध्ये पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे...