राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण

# राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण # पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण उरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते रविंद्र हरिश्चंद्र चव्हाण(महाड )यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण यांनी पक्षासाठी आजपर्यंत दिलेले योगदान, पक्षाचे तळागाळात प्रचार प्रसार करणे, संघटनात्मक मोट बांधणे, पक्षाचे ध्येय धोरणे जनते पर्यंत पोहोचविणे आदी कार्याचा विचार करून रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सदर नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार आणि संसदरत्न खा. सौ. सुप्रिया ताई सुळे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकण विभागीय अध्यक्ष मा...