११ वर्षांत भारताचा ऐतिहासिक कायापालट : नेतृत्व, तंत्रज्ञान आणि जनभागीदारीचे यश

११ वर्षांत भारताचा ऐतिहासिक कायापालट : नेतृत्व, तंत्रज्ञान आणि जनभागीदारीचे यश लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला - आमदार प्रशांत ठाकूर पनवेल (हरेश साठे): लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. त्यामुळे देशाने ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से सिद्धी’ या मंत्रांचा अंगीकार करत ऐतिहासिक परिवर्तनाचा काळ अनुभवला आहे. हा कार्यकाळ भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १२ ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ११ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि त्या अनुषंगाने सरकारने देशवासियांसाठी केलेले योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत...