आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (हरेश साठे) : आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. त्यांनी यावेळी बोलताना सर्वांचे आभारही मानले. पनवेल विधानसभेचे नेतृत्व करताना आमदार प्रशांत ठाकूर जबाबदारीने काम करत आहेत, त्यामुळे वडील म्हणून आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः हे देशाच्या विकासाचे मूळ उद्दिष्ट्य घेऊन काम करत आहे...