Posts

Showing posts from May 11, 2025

# रायगडमध्ये राजकीय भूकंप; शेकापक्षाला मोठा हादरा # शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश

Image
# रायगडमध्ये राजकीय भूकंप; शेकापक्षाला मोठा हादरा  # शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश  # भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार आशिष शेलार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत  पनवेल (हरेश साठे) शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला. पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा बसला आहे. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व...