देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सलग ७ वर्षे
देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सलग ७ वर्षे आपल्या देशातील १३५ कोटी जनतेच नेतृत्व यशस्वीपणे केल्या बद्दल भारतीय जनता संबंध देशभरात आनंद उत्सव साजरा करीत असून संघटन हेच सेवा धर्म म्हणून पक्षाच्या वतीने करोना महामारी व चक्रीवादळ चा आपल्या तालुक्यातील नागरीक संघर्ष करीत आहेत तसेच अनेक डाॅक्टर व परिचारिका दिवस-रात्र जनतेची सेवा कोवीड योध्दा म्हणून करीत आहेत यांच्या करिता विविध उपक्रम दवारे यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच म्हसळा तालुक्यामध्ये पांगलोली, कोंझरी, रेवळी, गणेशनगर, मेंदडी, आंबेत, ढोरजे, म्हसळा शहर, घोणसे, चिखलप, देवघर कोंड, आगरवाडा, खारगांव खुर्द, तोंडसुरे, व अन्य ठिकाणी गरजू व्यक्तींना ५ किलो अन्न धान्य किट चे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमात श्री कृष्णा कोबनाक , तालुका अध्यक्ष श्री. प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस श्री. महेश पाटील, शहर अध्यक्ष श्री.संतोष पानसरे, वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. महेश मेहता, तालुका उपाध्यक्ष श्री. दुर्जनसिंग राठोड, तालुका अध्यक्ष ओबीसी श्री. राजेंद्र चव्हाण, तालुका किसान मोर्चा श्री. किशोर गुलगुले व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यानी सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment