Posts

फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा!

Image
  फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा पनवेल(प्रतिनिधी) आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'तोडी मिल फँटसी' नाटकाचा प्रयोग शनिवारी पार पडला. भारतीय कला केंद्र प्रस्तुत, थिएटर फ्लेमिंगो आणि देसीरिफ इंडिया निर्मित तोडी मिल फँटसी हे म्युझिकल नाटक म्हणजे पनवेलकरांसाठी पर्वणीच ठरली.         हे नाटक घडतं ती जागा म्हणजे चक्क तोडी मिल सोशल रेस्टो आणि बारचं प्रशस्त बाथरूम! खरंतर बाथरूम मध्ये घडणारं नाटक ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. नाटक आधारित आहे मिल कामगारांचा आत्ताच्या पिढीला पडलेल्या प्रश्नांवर,ज्यांचे आई-बाप सुद्धा कामगार म्हणून जगले तेव्हा आपणही तेच चाकरीचं आयुष्य जगायच की स्वतःच्या बळावर बिझनेस करायचा या निर्णयाभोवती नाटक फिरतं.            अत्यंत कल्पक आणि हटके विचार मांडणारा नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा पनवेलचा राहणारा. त्याने आपल्या लेखणीतून मांडलेल्या फॅंटसीज, नाटकातील संवादांना मार्व्हल,गेम ऑफ थ्रोन्सचे दिलेले कंटेंपररी संदर्भ आणि सुपर कुल तरुणाईच्या भाषेचा दिलेला बाज यामुळे प्रेक्षकांकडून त्याने भरभरून दाद कमावली. ...

जनहित याचिकेमुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी 

  उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश.   आता अपघातग्रस्तांचे वाचणार जीव.   जनहित याचिकेमुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी     उरण दि 17(विठ्ठल ममताबादे)उरणमधील अपघात व त्यासंदर्भातील होत नसलेल्या उपाययोजना या संदर्भात उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी सध्या मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटिल आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या खंडपीठा समोर नियमितपणे सुरु आहे. JNPT परिसरात होणारे अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने राज्य सरकार आणि JNPT प्रशासनास रक्तपेढी आणि ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे आदेश दिले होते.त्याचमुळे 15 एप्रिल 2019 पासून उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवणुक केंद्र स्थापन करण्यात आले असून ते जनतेच्या सोयीसाठी तातडीने कार्यान्वयित करण्यात आले आहे. अपघात संदर्भातील उपाययोजना संदर्भात  दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येताच याचिका कर्त्यांचे वकील ऍड. प्रियांका सुरेश ठाकुर यांनी न्यायालय आणि राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकेणी यांच्यासमोर युक्तिवाद करताना वारंवार होणाऱ्...

शिवजयंती निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धा 

  शिवजयंती निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धा   पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १९ च्या वतीने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.      शोभायात्राची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारया सर्व स्पर्धकांना सहभाग सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धा 15 वर्षांखालील मुलामुलींनसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोदंणीसाठी 7757000000, 7502100100 या संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.      

डिजिटायझेशनकडे नेणाऱ्या प्रवासाच्या आघाडीवर आयपीएएस

देशभरातील राज्य सरकारांच्या नियोजन समित्या निधीचा वापर, प्रकल्प, प्रस्ताव आणि योजनांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनावर वेळोवेळी देखरेख करण्यासाठी कागदपत्रांशिवाय कामकाजाचा मार्ग अवलंबलत असून  डिजिटायझेशनकडे नेणाऱ्या प्रवासात  इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीमअर्थात आयपीएएस आघाडीवर आहे.    कालांतराने प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती जमा होऊन सरकारी संस्थांमध्ये फाइल्सचा ढीग जमा होतो. कागदपत्रांच्या अशा ढिगाऱ्यांमुळे व्यवस्थापनाचे आव्हान निर्माण होते. त्यातूनच निर्माण होणाऱ्या कामाला वेळेवर मंजुरी न मिळणे, योग्य पाठपुरावा तसेच कामाची देखरेख न केली जाणे, अशा समस्या उद्भवून कामाची प्रगती मंदावणे, कागदपत्रे गहाळ होणे, योग्य विश्लेषणाअभावी मानवी निधी व्यवस्थापन अवघड होणे इत्यादींमुळे हे चक्र सांभाळू शकणाऱ्या ऑटोमेशन सॉफ्टवेयरच्या अभावी प्रभावीपणे व कार्यक्षमपणे कामकाज हाताळले जाणे अशक्य होते.     आयपीएएस – इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम ही सॉफ्टवेयरवर आधारित यंत्रणा आहे, ज्यामध्ये फाइल्सबाबत प्र...

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नारसी मोनजी विद्यापीठने आणली अधिकृत परिक्षा

  बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नारसी मोनजी विद्यापीठने आणली अधिकृत परिक्षा    नवी मुंबई (प्रतिनिधी) मल्टि कॅम्पस व नामांकित असे नारसी मोनजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (एनएमआयएमएस )  विद्यापीठ हे  विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि संधी देण्यासाठी परिचित आहे.या विद्यापीठाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अधिकृत परीक्षा आणली आहे.         विद्यापिठामध्ये बी .टेक ,बीबी ए ,बी. कॉम ,बी.एस सी फायनान्स , बी एस सी इकॉनॉमिक्स , बी. डेस (हुमनाइझिंग टेंकनॉलॉजि), बी ए (हान्स), लिबरल आर्टस् अँड बी बी ए ब्रॅण्डिंग अँड ऍडव्हर्टायसिंग या पदवीधर कॉर्सेसाठी प्रवेश सुरु आहे.  एन पी ए टी च्या अंतर्गत एम बी ए  टेक (बी . टेक + एम बी ए  टेक),बी फार्म + एम बी ए (फार्म टेक ) हे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. एनएमआयएमएस एनपीएटी २०२०. परीक्षेसाठी मुंबई, शिरपूर, बेंगलुरू, हैदराबाद, नवी मुंबई, इंदूर आणि धुळे ह्या भागातील विद्यार्थ्यांना  www.npat.in  या ऑनलाईन वेबसाईट वर भेट देऊन नोंदणी करता येणार आहे....