# खांदा कॉलनी येथे सेवा निवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम संपन्न # शेकडो नागरिकांच्या तुफान गर्दी समोर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक उच्च अधिकारी तथा सेवानिवृत्त नागरिकांचा भव्य असा जोरदार सत्कार करण्यात आला. # समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांना खांदा कॉलनी नागरिकांची पहिली पसंती

# खांदा कॉलनी येथे सेवा निवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम संपन्न # शेकडो नागरिकांच्या तुफान गर्दी समोर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक उच्च अधिकारी तथा सेवानिवृत्त नागरिकांचा भव्य असा जोरदार सत्कार करण्यात आला. # समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांना खांदा कॉलनी नागरिकांची पहिली पसंती पनवेल : जितेंद्र नटे / रायगड मत आज रविवार, दिनांक 13 जुलै रोजी खांदा कॉलनी येथे सेवा निवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम करण्यात आला. श्रीकृपा हॉल येथील कार्यक्रमासाठी खांदा कॉलनी वार्ड क्रमांक 15 मधील शेकडो नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शरीराचे वय झालेले पण मनाने तरुण असणाऱ्या या अश्या रिटायर्ड नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जाताना पाहायला मिळाला. आपण आयुष्यभर कष्ट करतो कोण शासकीय नोकरी करतो तर कोण प्रायव्हेट नोकरी करतो. अगदी आयुष्यभर राबराब राबतो. मात्र त्यांना अभिनंदनाचा एक शब्द पण कुणाकडून ऐकण्यास मिळत नाही. मात्र या ठिकाणी शिवाजी साहेबराव थोरवे यांनी मात्र या गोष्टीचे महत्व हेरून त्यांनी या ...