विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवावी -शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ

विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवावी -शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ पनवेल (प्रतिनिधी) शिक्षणामुळे खूप काही शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपली गुणवत्ता टिकवून ठेवावी व सर्जनशीलता विकसित करावी, असे मार्गदर्शन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ यांनी केले. ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या 23व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन करणार्या विद्यार्थ्यांना गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ यांनी मनोगतात, परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षण हे महत्त्वाचे साधन नाही. आज मी शिक्षण उपसंचालक म्हणून जे पद भूषवित आहेत ते केवळ शिक्षणामुळे...