# मदत करणे हाच खरा धर्म - लोकनेते रामशेठ ठाकूर # माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; अखंड २२ वर्षे उपक्रम

# मदत करणे हाच खरा धर्म - लोकनेते रामशेठ ठाकूर # माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; अखंड २२ वर्षे उपक्रम पनवेल (प्रतिनिधी): पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. सुशिला जगदीश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेलमध्ये उत्साहात आणि मोठ्या थाटात संपन्न झाला. दुसऱ्याची मदत करणे हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हा धर्म सुशीला घरत आणि जगदीश घरत जपत आहेत असे गौरोद्वार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी काढले. हा कार्यक्रम नवीन पनवेलमधील सी.के.टी. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उप...