म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव याच्या मध्यभागी एम.आय.डी.सी. आणावी अशी आम्ही ४ तालुक्यांच्या वतीने नम्र विनंती करीत मागणी करीत आहाेत. - श्री. जितेंद्र नटे

प्रति, मा. श्री. उदयजी सामंत साहेब उद्याेग मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मादाम कामा राेड, मुंबई - 400032 विषय : म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव याच्या मध्यभागी एम.आय.डी.सी. आणावी अशी आम्ही ४ तालुक्यांच्या वतीने नम्र विनंती करीत मागणी करीत आहाेत. महाेदय, साहेब नमस्कार! गेली अनेक वर्षे आपण महाराष्ट्रात उद्याेग मंत्री म्हणून काम करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन! आपल्या कामासाठी आपण झाेकून देत अनेक नव-नवीन उपक्रम घेऊन येत आहात, त्याबद्दल आपले सबंध बेराेजगार तरुणांच्यातर्फे आपले आभार! मात्र आपण चांगले काम करीत असतांना ग्रामीण विभाग म्हणजे काेकणातील ओस पडत चाललेली गावे का ओस पडत आहेत. कृपया याकडे लक्ष वेधावे म्हणून मी हा पत्रप्रपंच करीत आहे. साहेब! आपणास ठाऊक असेलच आपण निरीक्षण केले असेल तर आपणास पहावयास मिळेल की, गेली कित्येक वर्षे काेकणी माणूस हा मुंबईवर अवलंबून आहे. कारण काय? तर, गावी कामधंदा नाही? नाेकरी नाही? त्यामुळे स्थलांतर थांबू शकलेले नाही. स्थालंकर का थांबत नाही? कारण गावी नाेकरी नाही? गावी नाेकरी का नाही? कारण गावी कंपन्या नाहीत? गावी कंपन्या का नाहीत? क...