4 तालुका विकास संघटनेची प्रथम सभा म्हणजे नवीन विचाराची नवीन सुरुवात....

4 तालुका विकास संघटनेची प्रथम सभा म्हणजे नवीन विचाराची नवीन सुरुवात .... रायगड मत / प्रतिनिधी दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी आज पहिली सभा झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे आणि ट्रेन प्रॉब्लेम मुळे अनेक लोक पोहचू शकली नाहीत. मात्र जे लोक आली होती त्यांनी मात्र आपले मनोगत व्यक्त करून आणि अनेक सुचनापर मार्गदर्शन करून सभेस वेगळाच रंग भरला.. येणाऱ्या काळात संघटनेने घेतलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत, हे त्यांना पटले आहेत. माणगांव लोकल ट्रेन सुरु झाल्यास त्याचा म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव या तालुक्यावर थेट कसा परिणाम होईल. याचे मार्गदर्शन अध्यक्ष जितेंद्र नटे यांनी थोडक्यात केले. आमदार अदिती तटकरे यांना पत्र, तसेच रेल्वे मंत्रालय यांना दिलेले पत्र आणि MIDC संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेले पत्र याची माहिती दिली. MIDC मुळे रोजगारं मिळेल आणि स्थलानंतर थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वे कनेक्टीविटी फार महत्वाची असून येणाऱ्या काळात लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी वेळ पडल्यास रेल्वे मंत्र्यांना जाब विचारू. रोहा पर्यंत सेंट्रल रेल्वे आहे. ...