# पनवेल - माणगांव लोकल ट्रेन सुरु करावी - जितेंद्र नटे # आमदार व कॅबिनेट मंत्री कु. अदिती तटकरे यांच्याकडे 4 तालुका संघटनेच्या वतीने पत्र देत लोकल ट्रेनची केली मागणी...

# पनवेल - माणगांव लोकल ट्रेन सुरु करावी - जितेंद्र नटे # आमदार व कॅबिनेट मंत्री कु. अदिती तटकरे यांच्याकडे 4 तालुका संघटनेच्या वतीने पत्र देत लोकल ट्रेनची केली मागणी... पनवेल (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र विकास कामे फास्ट होताना दिसत आहेत. मात्र म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव हे चार तालुके मात्र उद्योग धंद्यापासून वंचित राहिले आहेत. अशातच जर म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव यांना कनेक्ट करणारी पनवेल-माणगांव लाेकल सेवा सुरु केली गेली, तसेच बाहेरील मेल गाड्यांना माणगांव येथे थांबा देण्यात आला तर 4 तालुक्याना पुढे कनेक्ट करता येईल. असे पत्र अध्यक्ष जितेंद्र नटे यांनी नुकतेच अदिती तटकरे यांना सुपूर्द केले. आमच्या पत्राची दखल घेत पुढे खासदार आणि रेल्वे मंत्रलयाचा पाठपुरावा करावा अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे. याबद्दल सविस्तर बोलताना जितेंद्र नटे यांनी सांगितले की, मुंबईपासून जवळच रायगड जिल्हा आहे. उत्तर रायगड जिल्हयाचा झपाट्याने विकास हाेतांना दिसत आहे. मात्र दक्षिण रायगड जिल्हयातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव या ४ तालुक्याला मुंबईशी कनेक्टीवीटी नसल्यामुळे येथील स्थन...