Posts

Showing posts from July 21, 2025

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप*

Image
  *आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप* *सन्मित्र सेवा संस्थेचे समाजसेवाभावी अनेक उपक्रम* श्रीवर्धन / राजू रिकामे; श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावातील सन्मित्र सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कुडगाव आणि हरवित येथील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.         आदिवासी विद्यार्थ्यांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील अनेक शाळेतील गरजू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. ह्याही वर्षी देखील संस्थेच्या वतीने दोन्ही शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविक करताना शाळेतील शिक्षक गुणवंत नरूकर यांनी अशा मदतीमुळे विद्यार्थ्यांना आभ्यासाची गोडी निर्माण होते असे प्रतिपादन केले. संस्थेच्या वतीने ऍड.शैलेश चांदोरकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी आमची संस्था सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली. सदरच्या उपक्रमासाठी दिलीप पाटील मि...

बदलापूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘नित्या क्लासेस’तर्फे भव्य भरतनाट्यम कार्यक्रम

Image
  बदलापूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘नित्या क्लासेस’तर्फे भव्य भरतनाट्यम कार्यक्रम म्हसळा तालुक्यातील कोकबल गावची सुकन्या गार्गी योगेश येलवे हिनेही केले सुंदर परफॉमस बदलापूर, बदलापूर शहरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘नित्या क्लासेस’तर्फे एक भव्य भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या खास प्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि पारंपरिक भरतनाट्यम सादर करत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले. कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रशिक्षण हे सुप्रसिद्ध नृत्यशिक्षिका फाल्गुनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अथक मेहनतीने आणि नृत्यावरील प्रेमाने रंगमंचावर अप्रतिम सादरीकरण करत गुरूंप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हा कार्यक्रम एक भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा अनुभव ठरला. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले, आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी असे कला-संमेलन अनुभवण्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला