# कर्तव्य आणि हक्क एका नाण्याच्या दोन बाजू- लोकनेते रामशेठ ठाकूर # महारोजगार मेळाव्यात ५७८१ उमेदवारांचा सहभाग
# कर्तव्य आणि हक्क एका नाण्याच्या दोन बाजू- लोकनेते रामशेठ ठाकूर # महारोजगार मेळाव्यात ५७८१ उमेदवारांचा सहभाग पनवेल (प्रतिनिधी) कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २ ऑगस्ट) खांदा कॉलनी येथे केले. युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल, सीकेटी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात 'महारोजगार मेळावा २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,...