पनवेलमध्ये 'महारोजगार मेळावा'; नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

पनवेलमध्ये 'महारोजगार मेळावा'; नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल (प्रतिनिधी) युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने शनिवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात 'महारोजगार मेळावा २०२५' आयोजित करण्यात आला आहे. या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे असून, विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित कंपन्या या मेळाव्यात मध्ये सहभागी होणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त तसेच अकुशल उमेदवारही सहभागी होऊ शकतात. कंपन्यांच्या विविध विभागांमध्ये भरतीसाठी विविध प्रकारच्या पात्रता आणि क्षमतांनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हजारो रिक्त पदांवर भरती या मेळाव्यात होणार आहे. मेळाव्याद्वारे परिसरातील बेरोजगार ...