Posts

आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शाखा प्रमुख रोहन गायकवाड (बिन्दास्त) यांनी माहिते हॉस्पिटल मध्ये अडकलेल्या रुग्णाच्या वडिलांना केले मोलाचे सहकार्य

आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शाखा प्रमुख रोहन गायकवाड (बिन्दास्त) यांनी माहिते हॉस्पिटल मध्ये अडकलेल्या रुग्णाच्या वडिलांना केले मोलाचे सहकार्य पनवेल (जितेंद्र नटे) :  कु.किमया अविनाश घरत राहणार -नवेदर बेली(अलिबाग) या मूलीचे नवीन पनवेल येथील 'श्री.साई क्लिनिक (मोहिते हॉस्पिटल) येथे उपचार चालु होते.मुलीची तब्येत व्यवस्थित झाली असताना बिलाचा भरणा न केल्यामुळे  डिस्चार्जे मिळत नव्हता. मुलीचे वडील श्री अविनाश बाळकृष्ण घरत यांनी त्यांचे मित्र  श्री प्रकाश पाटील यांना याबद्दल संगीतले   आणि श्री प्रकाश पाटील यांनी  गोरगरिबांचे कैवारी सन्माननीय आमदार रायगड जिल्हा प्रमुख श्री महेंद्रशेठ दळवी यांच्याकडे या बाबत कैफियत मांडली.सन्मानीय आमदार श्री महेंद्रशेठ दळवी यांनी शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) यांना या बाबत आवश्यक सूचना देऊन संबंधित पेशंटचे वडील अविनाश घरत यांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले.शिवसेना शहरप्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) आणि शाखा प्रमुख श्री रोहन गायकवाड यांनी त्वरित डॉ.मोहिते हॉस्पिटल न.पनवेल येथे जाऊन मुलीच्या वडिल...

कोरोनो संदर्भात अधिक कार्यक्षम व्यवस्था करा  - आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना 

कोरोनो संदर्भात अधिक कार्यक्षम व्यवस्था करा  - आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना   पनवेल(प्रतिनिधी) कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासोबत आज (दि.१५) बैठक घेऊन या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातून अधिक कार्यक्षम व्यवस्था करण्याची सूचना केली.  कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा ३२वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल हद्दीतील संशयित तसेच बाधितांना योग्य तो उपचार मिळाला पाहिजे, यासाठी अधिक कार्यक्षमतेची योग्य व्यवस्था करावी अशी सूचना देऊन जनजागृतीवर अधिकाधिक भर देण्याचे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. या बैठकीस महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत आदी उपस्थित होते.                

TATA हॉस्पिटल मुंबई

*TATA हॉस्पिटल मुंबई* चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी .  1. कोरोना विषाणू चा आकार मोठा आहे 400-500 मायक्रो , त्यामुळे कोणत्याही साध्या मास्क मुळे संरक्षण होऊ शकते, खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही 2. विषाणू चे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही 3.कपड्यांवर पडलेला विषाणू 9 तास राहतो, केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास  विषाणू मरतो 4. हातावर पडलेला विषाणू 10 मिनिटे जगतो, स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा hand sanitizer वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे 5. थंड अन्न आणि icecream खाणे टाळा 6. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो, फुफुसात संसर्ग होत नाही. 7. 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही 8. गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका. 9. भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा 10. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करावा. 11. वाचून शेअर करा म्हणजे इतर मित्रांना व नातेवाईकांन...

युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी आनंद ढवळे

युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी आनंद ढवळ   पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी पनवेल तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी आनंद ढवळे यांची नियुक्ती जाहीर केली आहे.       त्यानुसार या कार्यकारिणीमध्ये सरचिटणीसपदी विश्वजित पाटील, उपाध्यक्षपदी राज पाटील, अनुप भगत, सचिवपदी अमर भोपी, रोहित घरत, कोषाध्यक्षपदी शैलेश माळी, तसेच सदस्यपदी आतिष मालुसरे, महेश पाटील, भरत फराड, धनंजय भोईर, दिलीप म्हसकर, दिनेश पाटील, रोशन पाटील आणि सुहास जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

         जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून    महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा 

           जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून    महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा  पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ धुतुम मध्ये ठेकेदारातर्फे काम करणाऱ्या हायवे रोडलाइन्स प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला.            चार वर्षासाठी झालेल्या या करारानुसार प्रथम वर्षी २ हजार, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षी प्रत्येकी १२०० रुपये असे एकूण ५६०० रुपयांची पगारवाढ तसेच गणवेश, साप्ताहिक सुट्टी, रजा, प्रवास भत्ता, शैक्षणिक भत्ता, कँन्टीन भत्ता, बोनस, कामगार विमा योजना, सार्वजनिक सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी, उत्सव अनुदान, ग्रॅज्युएटी आदी सुविधा या कामगारांना देण्यात येणार आहे.           सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी व्हनाल...

फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा!

Image
  फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा पनवेल(प्रतिनिधी) आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'तोडी मिल फँटसी' नाटकाचा प्रयोग शनिवारी पार पडला. भारतीय कला केंद्र प्रस्तुत, थिएटर फ्लेमिंगो आणि देसीरिफ इंडिया निर्मित तोडी मिल फँटसी हे म्युझिकल नाटक म्हणजे पनवेलकरांसाठी पर्वणीच ठरली.         हे नाटक घडतं ती जागा म्हणजे चक्क तोडी मिल सोशल रेस्टो आणि बारचं प्रशस्त बाथरूम! खरंतर बाथरूम मध्ये घडणारं नाटक ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. नाटक आधारित आहे मिल कामगारांचा आत्ताच्या पिढीला पडलेल्या प्रश्नांवर,ज्यांचे आई-बाप सुद्धा कामगार म्हणून जगले तेव्हा आपणही तेच चाकरीचं आयुष्य जगायच की स्वतःच्या बळावर बिझनेस करायचा या निर्णयाभोवती नाटक फिरतं.            अत्यंत कल्पक आणि हटके विचार मांडणारा नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा पनवेलचा राहणारा. त्याने आपल्या लेखणीतून मांडलेल्या फॅंटसीज, नाटकातील संवादांना मार्व्हल,गेम ऑफ थ्रोन्सचे दिलेले कंटेंपररी संदर्भ आणि सुपर कुल तरुणाईच्या भाषेचा दिलेला बाज यामुळे प्रेक्षकांकडून त्याने भरभरून दाद कमावली. ...

जनहित याचिकेमुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी 

  उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश.   आता अपघातग्रस्तांचे वाचणार जीव.   जनहित याचिकेमुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी     उरण दि 17(विठ्ठल ममताबादे)उरणमधील अपघात व त्यासंदर्भातील होत नसलेल्या उपाययोजना या संदर्भात उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी सध्या मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटिल आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या खंडपीठा समोर नियमितपणे सुरु आहे. JNPT परिसरात होणारे अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने राज्य सरकार आणि JNPT प्रशासनास रक्तपेढी आणि ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे आदेश दिले होते.त्याचमुळे 15 एप्रिल 2019 पासून उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवणुक केंद्र स्थापन करण्यात आले असून ते जनतेच्या सोयीसाठी तातडीने कार्यान्वयित करण्यात आले आहे. अपघात संदर्भातील उपाययोजना संदर्भात  दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येताच याचिका कर्त्यांचे वकील ऍड. प्रियांका सुरेश ठाकुर यांनी न्यायालय आणि राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकेणी यांच्यासमोर युक्तिवाद करताना वारंवार होणाऱ्...