Posts

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात  ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत  ३४ आरोपींच्या आवळल्या मुसक्या  पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाची कारवाई 

Image
        पनवेल : राज भंडारी  पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभाग हा प्रसिद्धीपासून दूरच राहत असल्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या कारवाई जनतेसमोर येत नाहीत. मात्र या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असून त्यामाध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर दंडात्मक महसूल उपलब्ध होत आहे. पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामीण पनवेल उत्पादन शुल्क विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लॉक डाऊनच्या काळात म्हणजेच अवघ्या २२ दिवसात तब्बल ६६ कारवाया करून ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल अवैध मद्यसाठा हस्तगत तसेच उध्वस्त केला आहे. यावेळी एकूण ३४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राज्य उत्पादन शुल्कविभाग हा महाराष्ट्रात सर्वाधिक महसूल मिळवून देणारा असा विभाग असून या विभागाचे ब्रीदच संवर्धन करणारे आहे. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असे ब्रीद घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देशी, विदेशी मद्य तसेच ताडीवरील शुल्क आणि विक्री नूतनीकरणाच्या शुल्कापोटी वर्षभरातून महाराष्ट्रातून जवळपास २० हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत...

टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा... वाहनासह केला तब्बल साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत.. मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई    पनवेल शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल 

Image
        पनवेल : राज भंडारी  टाळेबंदी कालावधीत अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल बस स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या हॉटेल दत्ता इन या बार विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये बियरचे छोटे मोठे टिन व काचेच्या बाटल्या मिळून एकूण १८७, ब्रीझर ५७, वाईन २३ तसेच सिग्नेचर व्हिस्की एकूण ८ बाटल्या (१८०मिली) असा मुद्देमाल अंदाजे ५३ हजार १५ रुपये आणि हुन्डाईची क्रीटा कार (किंमत १० लाख रुपये) असा एकूण १० लाख ५३ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावेळी मद्य विक्री करणाऱ्यासह दोघा गिऱ्हाईकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्व प्रकारच्या मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हॉटेल या व्यावसायिकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा राऊत, पोहवा आयरे, पोहवा थोरा...

खरसईकरांची एकजूट हीच आपली वज्रमूठ ...असे म्हणत खरसईगावातील सर्व समाजातील आणि राजकीय पक्षातील गावकरी कोरोना विरुद्ध लढ्यात झाली एकत्र

Image
  एक दिवस गावासाठी या संकल्पनेतून *गुरुवार दि १६/०४/२०२० रोजी* खरसई ग्रामपंचायत हद्दीत *जनता कर्फ्युचे* आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला गावातील सर्व समाजातील नागरिकांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती, सर्व सदस्य, ग्रामपंचायत खरसई,आगरी समाज,मुस्लिम समाज,कोळी समाज बौद्ध समाज,गावातील सर्व सामाजिक संस्था,सर्व राजकीय पक्ष यांनी कोविड-१९ करोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन खरसईकरांची एकजूट दाखवली याबद्दल मी आपला आभारी आहे. यापुढे ही विनंती आहे की शासनाने दिलेले सर्व निर्देश पाळा व करोना टाळा. *कोवीड १९ करोना विषाणू काळजी करू नका....काळजी घ्या*  

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरिबांना दिला एक हात मदतीचा

Image
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  खांदा कॉलनी सेक्टर 12 आणि आजूबाजूच्या परिसरातील गोर गरीब आणि गरजू आदिवासी आणि झोपडपट्टी मधील लोकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी पनवेल महानगरपालिका चे प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील आणि प्रभाग 15 चे अध्यक्ष शांताराम महाडिक उपस्थित होते

लॉकडाऊन मध्ये काय सुरु? काय बंध?

Image
  २० एप्रिल पासून किराणामालाचं दुकान, रेशनचं दुकान, फळ, भाज्या, मांस-मच्छी, पोल्ट्री, खाद्यान्न, डेअरी, दुधाची केंद्र आणि गुरांच्या खाद्यान्नाची दुकानं सुरू • ग्रामीण भागात सुरू होणार कारखाने. • शेतकऱ्यांना दिलासा. • बँक, पेट्रोल पंप सुरू. • आयटी सेक्टर सुरु. • शाळा महाविद्यालये बंद. • रस्ते निर्मितीला सुरु. • फार्मा इंडस्ट्रीला सुरु. • बस आणि मेट्रो बंद. • करोना हॉटस्पॉट विभागात बंद. • मास्क घालणं बंधनकारक लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात काही क्षेत्रांना सरकारनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागांना दिला देण्याचा सरकारनं प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे सामान तयार करण्याऱ्या आणि औषधांच्या कंपन्यांनाही दिलासा दिला आहे. दुसरीकडे रोजंदरीवर काम करणारे, प्लंबर, सुतारकाम करणारे, इलेक्ट्रीशिअन आणि मोटर मेकॅनिक्स यांनाही नव्या लॉकडाउनमधून सुट देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रान्सपोर्ट सेवा मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शाळा आणि महाविद्यालयंही बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यातून सुट देण्यात आली आहे त्यांनी सोशल डिस्...

खारघरच्या घरकुलला पोलिसांचा वेढा ! ....वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार  यांनी घराबाहेर पडणाऱ्यांना घातला लगाम

Image
खारघर: महापालिकेने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या खारघर सेक्टर 15 मधील विस्तीर्ण पसरलेल्या घरकुल सोसायटीतील रहिवाशांचा लगाम ओढत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी तिकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. मोकाट फिरणाऱ्यांसाठी तिसरा डोळा उघडून पाच पोलिसांची नियुक्तही केली आहे. घरकुल सोसायटीमधील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तो परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्या परिसराला सील करण्यात आले. खबरदारी घेत फवारणीही केली. परंतु, तेथील नागरिकांनी लॉकडाउन आणि महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुत्रे फिरवण्यापासून ते मोटरगाडीने फेरफटका मारण्याची स्पर्धा सुरू ठेवली होती. याबाबत पनवेल संघर्ष समितीकडे खारघरच्या काही जागृत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ती कैफियत समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी तिदार यांच्याकडे मांडली. पण त्यापूर्वीच तिदार यांनी घरकुलकडे जाणारे रस्ते सील केले आहेत. सोसयटीचा परिसर विस्तीर्ण पसरलेला असल्याने तिथे सहज बाहेर पडताना गाडी घेऊनच नागरिक जात आहेत. त्यांना आवर घालून सगळीकडे बॅरिगेट्स लावले आहेत. त्याशिवाय पाच पोलिस...

श्रीवर्धन तहसील कार्यालयात  सर्कल पदावर कार्यरत असणारे *मा. श्री अर्जुन भगत यांचा लॉक डाउन च्या अनुषंगाने एक हात मदतीचा..! 

Image
संपुर्ण जगात कोरोणा विषाणुने थैमान घातले आहे.यामुळे भारता मध्ये दि.२५ मार्च पासुन लाॉकडाऊन असल्या मुळे महाराष्ट्रातल्या रोजनदार ,मोलमजुरी करणाऱ्या वर्गावर उपास मारीची वेळ आलेली आहे.अशा संकटकाळीन वेळे मध्ये हाता वर पोट भरणा-या वर्गा साठी विविध स्तरावर मदत केली जात आहे. या मदतीला सहभाग म्हणून श्रीवर्धन तहसील कार्यालयात  सर्कल पदावर कार्यरत असणारे * मा. श्री अर्जुन भगत  साहेब * यांनी कित्येक मोलमजुरी करण्याऱ्या कामगारांना स्वतःच्या  पैसे खर्च करून जिवनाशक वस्तूचा पुरवठा करत आहेत त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे