Posts

चिंचपाडा येथील भराव काढल्याने पनवेल शहराला पुराचा धोका कमी

Image
पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे चिंचपाडा येथील गाढी नदीच्या पूलाखालील  भराव काढण्यात आल्याने या वर्षी पनवेल शहरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका कमी झाली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी दिली.                पनवेल शहरात मागील वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसात  गाढी नदीचे पाणी पनवेल शहरातील साई नगर ,बावन्न बंगला ( दि .बा. पाटील नगर ) , पटेल मोहल्ला खाडी,वीट सेंटर ,कोळीवाडा भागात 5-8 फुट पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चिंचपाडा भागात गाढी नदीवरील पूलाखाली मातीचा भराव असल्याने पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पुर सदृश्य स्थिति निर्माण झाल्याचे लक्षात आले होते.               या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही परिस्थिति शासनाच्या लक्षात आणून दिली होती. कोरोंनाच्या लॉक डाऊन काळात शहरात आणि महामार्गावर रस्त्याची आणि पावसाळ्यापूर्वीची कामे सध्या जोरात ...

आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाची मदत 

    पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब  नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.               त्या अनुषंगाने पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटीजवळ 'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यत ३०० गरीब गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. लॉककडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम चालूच राहणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मागर्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आज आमदार प्रशांत ठाकूर...

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने महापालिका क्षेत्रात अन्नछत्र  

  पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.          आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या अन्नछत्राला भेट देऊन गरजूंना जेवण वाटप केले. पनवेल महापालिका क् षेत्रात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले असून याबद्दल  भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे  केल्या जाणाऱ्या या कामाचे कौतुक केले तसेच अन्नछत्राला जागा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. लॉक डाऊन संपेपर्यंत हे अन...

नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक  पोलिस आयुक्तपदी विनोद चव्हाण यांनी पदभार स्वीकारला

        पनवेल: पनवेल पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत असताना बढती मिळालेले विनोद चव्हाण यांची नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला. विशेष शाखेचे पोलिस आयुक्त गोवेकर यांची बदली पुण्यात झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी चव्हाण यांनी पदभार घेतला. चव्हाण यांना मुंबई रेल्वे विभागात बढतीनंतर बदली देण्यात आली होती. तिथे त्यांनी काही महिने काम केल्यावर राज्य शासनाच्या गृहखात्याकडून त्यांना नवी मुंबईत पाठवण्यात आले आहेत. 2020 मध्ये चव्हाण या पदावरून निवृत्त होतील. पोलिस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलिस आयुक्त असा त्यांच्या कार्याची चढता आलेख कौतुकास्पद राहिला आहे.

शासनाच्या योजनांपासुन वंचित राहिलेल्यांना प्रशासनाने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी… - आ. अनिकेतभाई तटकरे यांची शासन व प्रशासनाला विनंती…

Image
  रायगड : (प्रतिनिधी) सामाजिक जाणिवा जागृत असलेले कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अडचणीत असलेल्या लोकांना सातत्याने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असुन आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मदत मिळाली आहे. ज्या लोकांकडे शिधापत्रिका नाही अशा शासनाच्या योजनांपासुन वंचित राहिलेल्या लोकांसाठी शासन व प्रशासनाने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती आ. अनिकेतभाई तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी निधि चौधरी यांना केली आहे.  गेला महिनाभर सामर्थ्याने, जिद्दीने करोनाच्या संकटाला सर्वजण तोंड देत आहेत विशेषत: मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनी धैर्याने, सबुरीने प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यांच्या संयमाचे व धैर्याचे  आ.अनिकेतभाई तटकरे यांनी विशेष कौतुक केले असुन त्यांच्यापैकी अनेक जणांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने बऱ्याच जणांकडे आर्थिक संकट ओढावले असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली  आहे  . रेशनकार्ड जवळ नसलेल्या, शासनाच्या योजनांपासून व...

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणने पकडलेल्या चालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

      संपर्कात आलेल्या पोलिसांना केले क्वारंटाईन लॉकडाऊनमध्ये वरळी येथील कुटुंबाला कारने आणले होते श्रीवर्धनमध्ये रायगड पोलीस दलात खळबळ; रायगडकरांची चिंता वाढली अलिबाग । लॉक डाऊन असताना वरळी येथील कुटुंबाला कारने श्रीवर्धनमध्ये घेऊन आलेल्या चालकाला अटक करायला गेलेल्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. अटक केलेल्या वाहनचालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली आहे.  श्रीवर्धनमध्ये भोस्ते गावात कोरोना पॉझिटीव्ह सापडलेले पाच जणांचे कुटुंब हे लॉक डाऊन असताना एका कारने वरळीहून श्रीवर्धनमध्ये आले होते. त्यामुळे दक्षिण रायगडात खळबळ उडाली होती. तसेच लॉकडाऊन असताना हे लोक कारने आलेच कसे? याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. प्रशासकीय यंत्रणेलाही ही बाब काळजीत टाकणारी होती. या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक जमीन शेख यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकावर या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबद...

कोरोना चा पार्श्वभूमीवर, मुंबई दुरदर्शन  केन्द्रा मध्ये हंगामी कर्मचार्यांचे वेतन मिळणे बाबद अतिरिक्त अधिकारी यांच्याकडे केली  मागणी

        मुंबई वरळी (महेश कदम  प्रतिनिधी) - गेले काही दिवस कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असलेल्या संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  एवढा मोठा कोरोनाचा संकट अख्ख्या जगात पसरला असताना आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे साहेब  वारंवार जनतेच्या सुरक्षिततेसाठी घरात राहण्याचे आव्हान करीत आहेत.  शासनाचे पालन करा, लोकांना त्यांचे वेतन दिले जाईल. परंतु अशा परिस्थिती मध्ये ही  दूरदर्शन चे अधिकाऱ्यांनी जे कामावार आले अाहेत त्यांना वेतन देऊ आणि जे अशा  परिस्थिती येऊ शकले नाहीत त्यांचा  वेतन न देण्याची भूमिका करत आहेत  १५० कर्मचार्यांपैकी ५०% हंगामी कर्मचारी हे वरळी विभागात राहतात जो विभाग पालिकेने रेड झोन म्हणून घोषित केले आहे आणि काही भाग सील करण्यात आले होते, असे असतानाही वेतन न मिळण्याच्या भीतीने ज्यांना शक्य होते ते कर्मचारी ऑफिस चे काम थांबू नये म्हणून कामावर जात होते. हंगामी कर्मचाऱ्यांना कोणतीही वैद्यकीय सेवा नसताना  १५,००० वेतनासाठी जीवाला धोका पत्करत ...