Posts

कोरोना पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची तळा तालुक्याला भेट. जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना गावी परत पाठविण्याचे नियोजन.

Image
      (तळा श्रीकांत नांदगावकर) कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळा तालुक्याला भेट देऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव,पो.नि. सुरेश गेंगजे,मुख्याधिकारी माधवी मडके,वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवटकर व पत्रकार बांधव उपस्थित होते.लॉकडाऊन मुळे इतर जिल्ह्यातील व राज्यातील कामगार,मजूर व नागरीक रायगड जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठविण्यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करतात आतापर्यंत जवळपास साठ हजार मजुरांनी गावी परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत या मजुरांसाठी ज्यावेळी त्यांच्या राज्यातून आपल्याला परवानगी मिळेल त्यावेळी त्यांना आपण रेल्वेची सुविधा उपलब्ध करणार आहोत.आजपर्यंत तीन रेल्वेने आम्ही नागरिकांना मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये पाठविले आहे व आज  रोजी दोन रेल्वे गाड्या आपण ओडिसा आणि मध्यप्रदेश साठी पाठविणार आहोत दि.१० रोजी झारखंड साठी रेल्वे सोडणार आहोत.तसेच रायगड जिल्ह्यात इतर ...

गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरु होईल : अनिल परब परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती

Image
    जितेंद्र नटे / रायगड मत  raigadmat.page मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून एकावेळी एका बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच गावाला जाता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून एकावेळी एका बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच गावाला जाता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज 'रायगड मत'ला दिली. येत्या १७ मेपर्यंतच ही सुविधा असेल असंही त्यांनी सांगितलं. पर...

दुर्दैवी हताश कोकणी माणूस!  मुंबई करांचा संयम आता सुटत चालला.  Lokdown ने घेतला आपल्या बहिणीचा बळी

Image
      माणगाव / जितेंद्र नटे रायगड मत  raigadmat.page  आज Lokdown उठेल, उद्या उठेल म्हणून चाकरमानी वाट पाहत राहिला. पण कुणाला याची पर्वा ना राहिली. माणगाव येथे अशीच एक हृदय द्रावक घटना घडली. नालासोपारा वरून श्रीवर्धन कडे निघालेली सलोनी देवेंद्र बांद्रे (वय ३०) ही आपली बहीण Lokdown ची हकनाक बळी गेली. पती देवेंद्र दत्ताराम बांद्रे व मुलांसह चालत आपल्या मूळ गावी श्रीवर्धन तालुक्यातील मारळ येथे निघाल्या होत्या. रस्ता तुडवत तुडवत हे कुटुंब बुधवारी (६ मे)ला दुपारी माणगावपर्यंत कसेबसे पोहोचले. उन्हातान्हातून चालून थकल्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले आणि त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या. तिथेच घात झाला. माणगाव पासून आपण आता घराच्या जवळ आलो आहोत या आशेने त्या घराच्या ओढीने न थांबता चालत होत्या. मात्र तिचे प्रयत्न अपयशी ठरले. Lokdown ने तिचा बळी घेतला.  का गेली ती पायी चालत? काय कारण आहे. त्याचे? कारण ही भयानक आहे. हातात काम नाही आणि पैसा ही नाही. मग करणार काय? आणि  Lockdown उठेल याची काही ग्यारंटी नाही. सरकार तर काही स्थानिक लोकांसाठी करीत नाही. याची जाणीव झाल्यामुळ...

ब्रेकिंग न्यूज - संपूर्ण कामोठे  कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

Image
    पनवेल दि.०८ मे २०२० आयुक्त गणेश देशमुख यांचा मोठा निर्णय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आज हा निर्णय घेण्यात आला आहे. कामोठेचे क्षेत्रफळ 2.76 चौ.किमी आहे. लोकसंख्या 1.13 लाख आहे. तसेच येथे आजअखेर 54 आहेत. एकूण महानगरपालिका क्षेत्रात 138 पैकी 40% रूग्ण एकट्या कामोठ्यात आहेत. त्यामुळे कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी सदरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती करण्यात येत असत परंतु कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.   सदर भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकतील.

कोकण हापूस " पहिला मोबाईल  ॲप प्ले स्टोअर वर उद्यापासून उपलब्ध कोकण हापूसचे अत्याधुनिक डिजिटल मार्केटिंग देवगड रत्नागिरी केळशीचा  ओरिजनल हापूस आणि कर्नाटकचे  डुप्लिकेट हापूस

Image
            केमिकलचा, कार्बाइडचा वापर करून चार दिवसात आंबे पिकवणे, किंवा कर्नाटक चे हापूस सारखे दिसणारे डुप्लिकेट हापूस कोकणातल्या हापूस मध्ये मिक्स करणे, किंवा  कर्नाटक  आंबा देवगड रत्नागिरी हापूस म्हणून विकणे अशा गैरप्रकारांना मुळे मागील दहा पंधरा वर्ष कोकणातील हापूस बदनाम झाला. हापूसची ती जुनी जगप्रसिद्ध आंबट गोड चव,  घरभर पसरणारा सुगंध, आणि तो  केशरी रंग  सर्वच  हरवलं होतं.       पण करोना च्या या लॉकडाऊन मध्ये ग्लोबल कोकणने   एक उपक्रम राबवला  नैसर्गिक पद्धतीने गवताच पिकवलेला  हापुस आंबा  ग्लोबल कोकण हापूस या ब्रांड ने  थेट सोसायट्यांमध्ये घरोघरी दिला. अशाच स्वरूपाचे उपक्रम  कोकणातल्या शेतकऱ्यांनी आणि युवकांनी राबवले आणि त्यामुळे आंबा प्रेमी मुंबईकरांना पुणेकरांना हापूस ची जुनी  चव सापडली. जगात कोकणातल्या हापूस आंब्याला तोड नाही भारत सरकारने कोकणातल्या हापूसला जी आय मानांकन दिले आहे. त्यामुळे यापुढे केवळ कोकणातल्या हापूसला हापूस म्हणता येईल अशी कायद्याने तरतूद झाली. आणि...

कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने लाॕकडाऊनमूळे बेरोजगार, हातावर पोट असणाऱ्या गरजू कुंटूंबांना अन्नधान्य स्वरुपात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

Image
         कास्ट्राईब संघटनेच्या शिक्षक बंधु भगिनी यांनी दानाचे आवाहन करुन कोरोना या महामारी मध्ये बेरोजगार उपाशीपोटी  कुटुंब बांधवांना  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले (5 किलो तांदूळ,2 किलो गोडेतेल,2 किलो साखर,पाव किलो चहा पावडर,1किलो मुगडाळ,मिठपुडी, मसाला,) किटचे वाटप करण्यात आले संकटसमयी संघटनेच्या वतीने उचललेला मदतरुपी खारीचा वाटा  गोरगरीब गरंजूच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करणारा होता.      दिनांक 1 मे ते 3 मे दरम्यान कल्याण विठ्ठलवाडी, शहाड,अंबरनाथ, वांगणी, बदलापूर, उल्हासनगर,मुरबाड या ठिकाणी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप  कोकणविभाग अध्यक्ष संतोष गाढे,ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राहुल हुंबरे,वंचित बहुजन आघाडीच्या महीला अध्यक्षा माया कांबळे,वांगणी-युवानेता नविन वाघमारे,मिलींद शिलवंत,प्रकाश वाघमारे, प्रसिध्दी प्रमुख योगेश येलवे,समता सैनिक दलाचे पदाधिकारी सुनिल भालेराव हे उपस्थित होते.या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोकण कार्याध्यक्ष दिनेश शिंदे,भिव...

गावी जाण्यासाठी कोण गाडीची व्यवस्था करतोय का? मुंबईकर चाकरमान्याची सार्थ हाक

कुठे गेले नेते? कुठे गेले सरपंच? कुठे गेले आमदार? कुठे गेले सभा(पती), कुठे गेले पदाधिकारी?  गावी जाण्यासाठी कोण गाडीची व्यवस्था करतोय का? मुंबईकर चाकरमान्याची सार्थ हाक.  जगावे कि गावी जावे? हा एकच प्रश्न सद्या कोकण वासियांना सतावत आहे. म्हसळा / जितेंद्र नटे (रायगड मत)                मुंबई मधे वसई, विरार, भायंदर, नालासोपारा, बोरिवली, कांदिवली, दादर, वडाळा, डोंबिवली, तसेच नवी मुंबई आणि इतर ठिकाणी अनेक चाकरमानी अडकून पडले आहेत. कुठे गेले नेते मंडळी आणि त्या आपल्या लाडक्या नेत्यालाच निवडून आणा! असे फुगा येईस्तोव बोंबलून सांगणारे त्यांचे लेफ्ट हॅन्ड, राईट हॅन्ड कार्यकर्ते? कुठे गेले भाई? कुठे गेले दादा? कुठे गेले भाऊ? कुठे गेले साहेब? कुठे गेले गावचे पक्षाचे पदाधिकारी? जे नेहमी सांगतात यांना आपण मतदान करू या, आपल्याला गावचा विकास होईल, मंदिराला देणगी मिळेल असे सांगणारे नेत्यांचे लोमडीगिरी करणारे? गेले कुठे?               आता खरी गरज आहे गावी जाण्यासाठी गाड्यांची? लोक अडकून पडली आहेत. म्हसळा, श्रीवर्धन,...