Posts

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची नाहक बदनामी शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे  राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न

Image
      पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने घेतलेल्या फीवाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. पालकांच्या आडून युवासेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी स्कूल तसेच संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांची बदनामीकारक बातमी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आणि सामना या मुखपत्राच्या 10 मे 2020च्या अंकात दिलेली आहे. त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. युवासेनेचे कार्यकर्ते रूपेश पाटील व त्यांचे सहकारी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांना 9 मे रोजी दुपारी भेटले व त्यांनी निवेदन दिले. त्याचा फोटोही ‘युवासेनेच्या दणक्यानंतर निर्णय मागे’ या आशयाखाली मिरविण्यात आला आहे. प्रत्यक्षात या तरुण मुलांना ’सीबीएसई स्कूल फीवाढीची प्रक्रिया काय असते’ याचा थांगपत्तासुद्धा नाही. महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी म्हणजेच 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षाची अगोदर ठरलेली फी 2020-21 वर्षाकरिता रिव्हाइज (नवीन फी) करण्यासाठी स्कूल सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर पीटीए कमिटीच्य...

अनिल परब यांच्या आश्वासनानंतर एसटी महामंडळाचा गोंधळ  मोफत प्रशासाठी पनवेल बस स्थानकात गर्दी मात्र अशी सूचना नसल्याचा कर्मचाऱ्यांचा निर्वाळा

Image
        पनवेल : राज भंडारी    महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजू र, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळाकडून याला कोणत्याही प्रकारची पुष्टी मिळालेली नसतानाच यावरून झालेल्या गोंधळामुळे अनिल परब यांनी केलेली घोषणा तूर्तास तरी स्थगित करण्यात आली. सोमवारी पनवेल एसटी बस स्थानकाजवळ परराज्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.    यावेळी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मोफत सेवा उपलब्ध नसल्याचे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सांगण्यात आल्याने प्रवाशांचा भ्रमनिरास झाला. यावेळी परराज्यातील नागरिकांनी आपापले सामान घेऊन बस स्थानक परिसरातच तळ ठोकला. तर यावेळी एस टी महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवेमार्फत प्रवास करण्याऱ्या जबाबदार कर्मचाऱ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव ...

नवी मुंबई सिडको अध्यक्षपदासाठी उरण राष्ट्रवादीची आगेकूच  प्रशांत पाटील यांच्या नावासाठी कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

Image
      पनवेल : राज भंडारी      आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई जिल्हानिरिक्षक प्रशांत पाटील यांची सिडको अध्यक्ष पदी निवड केली जावी अशी मागणी उरण तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, उरण विधानसभा अध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर आणि उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.  प्रशांत पाटील यांनी बेलापुर आणी ऐरोली दोन्ही मतदार संघात जिवाची पराकाष्ठा करुन, जसे जणू तेच निवडणुकीसाठी ऊभे आहेत म्हणून नवी मुंबई मधे दोन्ही मतदार संघात कुठलाही आधार नसताना, कार्यकर्त्यांची फळी तुटलेली असतानाही, सर्वाना एकत्र करुन आधार देऊन, एका  कुटुंबाप्रमाणे देखभाल केली आहे. खुप कमी वेळात नवी मुंबईत उरण, पनवेलचे कार्यकर्ते आणी आपल्या भुमिपुत्राची मने जिंकून त्यांनी काम केले. पक्षाला निसटता पराभव जरी भेटला पण कमी वेळात स...

थोडे धीर धरा, संयम पाळा st प्रवास सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत - आमदार अनिकेत तटकरे यांनी दिला सल्ला

Image
    म्हसळा (जितेंद्र नटे) 10 x 10 च्या खोलीत कोरोनाच्या भीतीने जगावे कि, ST ने गावी जावे चाकरमाण्याचा एकच प्रश्न "आमदार साहेब, राशन पाणी संपलं, आम्ही 2 महिने संयमच पळतोय अजून किती पाळायचा" - मुंबईकर चाकरमानी लोकांनी नालासोपारा st डेपो आणि परळ st डेपोत केली तुफान गर्दी "मुंबईकर Lockdown मुळे अडकले आहेत त्यांची काळजी आम्हाला आहेच, पण गावी सुद्धा लोक सुरक्षित राहणे तितकेच महत्वाचे आहे." - अनिकेत तटकरे  "गावचे लोक विरोध करीत आहेत, एकूण 3 लाख लोक कोकणात जाणारी आहेत. त्यामुळे त्यांना ठेवणार कुठे? 17 तारखे पर्यंत st सोडणार नाही" - परिवहन मंत्री (ढिसाळ मंत्री) अनिल परब बडबडले   "मुंबईकर गावी जाण्यासाठी याचना करीत आहेत. मात्र गावची लोक विरोध करीत आहेत, असे म्हटले जाते. हे मात्र गाववाले चुकीचे करीत आहेत. हमेशा गाववाल्यांसाठी धावून जाणारे मुंबईकर आज संकटात आहे. तर गाववाल्यानी विरोध करण्यापेक्षा आपल्या मुंबईकराना अलगीकरण करुंन 14 दिवस सांभाळू शकत नाहीत का? हीच का ती माणुसकी." - वैतागलेला एक निराश चाकरमानी  परराज्यातील, पर देशातील लोकांना सरकार आणू शकतो. त्या...

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर..

Image
          म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर   देशात व राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात काही जिल्ह्यात शिथिल करण्यात आल्या असून तसेच रायगड जिल्ह्याचा ऑरेंज झोन मधे समावेश झाल्याने म्हसळा तालुक्यातील विविध सेवा सुरू होणार अशी माहिती नागरिकांमध्ये पसरली आहे. दि.4 मे ला लॉकडाऊन पुन्हा सुरू झाल्याने अनेक नागरिक संभ्रमात आहेत. बाजारपेठ मधील काही दुकाने सुरू होणार आणि कडधान्य, भाजीपाला व मेडिकल सह अन्य सेवा सुविधा सुरू होणार अशी माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. दि.4 व 5 तारखेला म्हसळा बाजारपेठ मधील कडधान्य, भाजीपाला, मेडिकल सह इतर काही सेवा सुविधांची दुकाने उघडली गेली होती. त्यामुळे 17 मे पर्यत घोषित केलेल्या लॉकडाऊन काळात म्हसळा बाजारपेठ बंद राहणार की सुरू राहणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. तसेच स्थानिक म्हसळा नगरपंचायत बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार आहे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.    म्हसळा तालुक्यातील बाजारपेठेत दोन दिवस गर्दीने उ...

स्व. जनार्दन भगत यांच्या कार्यापासून स्फूर्ति घेऊन ती वर्षभर म्हणजे 365 दिवस जतन करा-- लोकनेते रामशेठ ठाकूर

Image
    पनवेल ( प्रतिनिधी ) थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जन्म दिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ति घेऊन ती वर्षभर म्हणजे 365 दिवस जतन करा असे, आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन  लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज  (गुरुवार दिनांक ०७ मे  २०२०) येथे केले. कोरोना विषाणू संसर्गच्या दृष्टिकोनातून सामजिक अंतर नियमांचे पालन करून कष्टकऱ्यांचे  नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची   ३२ वी पुण्यतिथी झूम ॲपचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने एकाच वेळी साजरी करण्यात आली.      लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे निवासस्थानी स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर , सभागृह नेते परेश ठाकूर , वर्षाताई ठाकूर ,अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर , भाजपचे प्रवक्ते वाय.टी.देशमुख उपस्थित होते तर ऑनलाईन शेलघरहून अध्यक्ष अरुणशेठ भगत,  संजय भगत, सीकेटी नवीन पनवेलहून डॉ.एस.टी. गडदे, इंदुमती घरत, संतोष चव्हाण , उज्वला  कोटीय...

कोरोंना विरूढ लढण्यासाठी प्रशासनाला स्थायी समितीने दिले आर्थिक बळ

Image
          पनवेल : कोरोंना विरूढ लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतू नाशके, किट आणि इतर साहित्य, खरेदी करण्यासाठी आणि  तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्या सोबत लोकप्रतिनिधी ही असल्याचे दाखवून दिले असल्याचे  शुक्रवार 8 मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेनंतर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. यासभते पावसाळयापूर्वीच्या नाले सफाईच्या कामांना ही मंजूरी देण्यात आली.        पनवेल महापालिकेची स्थायी समितीच्या  सभा क्रमांक 33 आणि 34  शुक्रवारी आदय क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात घेण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे 19 आणि 5 विषय अजेंडावर होते. दुपारी 12 वाजता  स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांचे अध्यक्षतेखाली  सभा सुरू झाली.  यामध्ये महापालिकेच्या शिल्लक निधीची गुणवणूक राष्ट्रीयकृत बँकेत करण्यास मंजूरी देण्यात आली. या सभेत कोरोंना प्रतिबंधक उपायांसाठी लागणारे किट, जंतू नाशके , हँड ग्लोज, मास्क  इत्यादि खरेदी करण्यास  झालेल्या खर्चास आणि नवीन ख...