Posts

चिपळे ग्रुप ग्राम पंचायतीची कोरोनाला आमंत्रण

Image
    पनवेल/वार्ताहर पनवेल तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या चिपळे ग्रुप ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये वेळीच घनकचरा उचला जात नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.    चिपळे ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील मौजे कोप्रोली येथील क्वालिटस गार्डन को ऑपरेटिव्ह हौसिंग या २३२ मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचा या सोसायटीतच कचऱ्याचा ढीग गेल्या पंधरा दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत पडला आहे.ग्रामपंचायती कडे सोसायटीतील लोकांनी वारंवार विनंती करून ही ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सोसायटीतील नागरिकांनी आपल्या कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावावी असे अजब लेखी पत्राने उत्तर दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाही तर आता कचरा टाकण्यासाठी कुठे जायचे?असा यक्षप्रश्न सोसायटीतील नागरिकांना पडला आहे.   एकीकडे कोरोनाची भिती त्याच बरोबर कचऱ्याची दुर्गंधी अश्या परिस्थितीत येथील नागरिक जीवन जगत आहेत.या घाणीमुळे तसेच त्यापासून सुटलेल्या दुर्गंधीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.उद्या या घाणीमुळे सोसायटीतील नागरिका...

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध,  प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

Image
 योगेश येलवे - प्रतिनिधी -  ज्या  ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे अश्या  ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याने हे घटनाबाह्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.  प्रशासक नेमायला आमचा विरोध असून निवडणूक घेता येत नसतील तर आहे त्या ग्रामपंचायतीलाच सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांकडे केली.      आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांनी  राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात मुदत संपत आलेल्या अनेक ग्रामपंचायती असून काही ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. अशा ठिकाणी प्रशासक नेमण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र  या अध्यादेशाचा गैरफायदा घेण्यात येत असून राष्ट्रवादी पक्षाने आपली दुकाने मांडली आहे. ज्यांना प्रशासक म्हणून अर्ज करायला सांगितले आहे त्यांना ११ हजार रुपयांची पावती अर्जा सोबत जोडायचे आहे शिवाय प्रशासक म्हणून...

राजगृह वरील हल्ल्यातील आरोपी अद्याप अटक का झाले नाहीत याकरिता वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करणारे प्रशासनाला निवेदन दिले

Image
        योगेश येलवे - मुंबई प्रतिनिधी - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडक" यांच्या  राजगृह ह्या निवस्थानावर हल्ला करणारे अद्याप जेबरबंद का झाले नाहीत ? या करिता निषेध व्यक्त करणारे पत्र मा,उपविभागीय अधिकारी माणगांव यांच्या मार्फत मा, मुख्यमंत्री महोदय याना आज वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुक्याचे तरुण तडफदार युवानेते माणगांव तालुका महासचिव मा,रोहन साळवी यांच्या वतीने देण्यात आले सदर आरोप लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत आणि या मागचा सूत्रधार लवकरात लवकर जनतेच्या समोर यायला हवा ही मागणी या निवेदनातून करण्यात आली आणि जर का हे आरोपी मिळायला अजून विलंब होत असेल तर वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील जाहीर करण्यात आले आहे सदर निवेदन हे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष मा.विश्वतेज साळवी आणि रायगड जिल्हा महासचिव मा,सागर भालेराव यांच्या सुचनेने देणायत आले,सदर निवेदन देताण पुढील युवा कार्यकर्ते उपस्थित होते,कॉर्नर ग्रुप् लोनेरे चे संस्थापक, नरेश टेंबे, संदेश जांम्बरे, हरशल शिदे, रोहित सकपाल, शैलेश मोरे, अनिकेत साळवी, अतिष टेंबे. ...

ओरियन मॉल ‘कोवीड सेंटर’ म्हणून ताब्यात घ्यावे. राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलची मागणी.

Image
  पनवेल/प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग तसेच पनवेल महानगरपालिकेतील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पनवेल महानगर पालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णांसाठी सुश्रुषा व सेवा पुरविणे कामी एक हजार खाटांची/बेडची रुग्णसेवा करण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय मिळकत असलेल्या फायनल प्लॉट क्र. 311 (ओरियन मॉल) ताब्यात घेवून तेथे तातडीने कोरोना सेंटर उभारण्याची मागणी राजे प्रतिष्ठान मार्फत जनतेेेसाठी रायगड जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार पनवेल, उपविभागीय अधिकारी पनवेल यांना केली आहे. अं.भू.क्र. 311 विषयी यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी यांनी तृतीय स्मरणपत्र दि. 8 डिसेंबर 2019 रोजी पत्र क्र. मशा/जी/अ-2/38829/2019 रोजी तहसीलदार पनवेल यांना तातडीने कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल टपाली पाठविण्याचे निर्देष दिलेले आहेत. तसेच सदर शासकीय मिळकती संदर्भात यापूर्वीच भ्रष्टाचार निर्मुलन समिती कोंकण विभाग आयुक्त कोंकण विभाग यांचे मार्फत जिल्हाधिकारी रायगड यांनी तहसीलदार पनवेल यांना 1 जुलै 2019 रोजी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते व आहेत. कोवीड-19 सारख्या जागतिक टाळेबंदी वेळी सदर शासकीय म...

पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी टिलिमिली मालिका    एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनचा पुढाकार  - जयंत भगत 

Image
  पनवेल(प्रतिनिधी) राज्यातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका २० जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत यांनी दिली आहे. याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.        एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेऊन हा प्रकल्प तयार केला असून, राज्यातील दीड कोटी विद्यार्थ्यांना या मालिकेमुळे शिकण्याची संधी निर्माण झाली आहे.करोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद आहेत.ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र इंटरनेट कनेक्टिविटी, स्मार्टफोन आणि तत्सम साधने उपलब्ध होण्यातील अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. या भूमीवर 'एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन' या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या 'सह्याद्री व...

पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी  सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून द्या 

Image
    - आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी       पनवेल(प्रतिनिधी) पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.             या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री महोदयांना निवेदनही दिले आहे. आ. ठाकूर यांनी केलेल्या मागणीत म्हंटले आहे कि, पनवेल, उरण तसेच नवी मुंबई मधील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पासाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादीत केलेल्या असून त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत . ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या...

५० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी करण्याची विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी  पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी २४ जुलै पर्यत लॉकडाउन वाढविण्यात आले असून, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ५० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.  

Image
          पनवेल महापालिका हद्दीत कोरोना चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे वारंवार प्रयत्न करत आहेत अशा सूचना ते पालिकेला करताना दिसून येत आहेत . तसेच  पनवेल पालिका , आयुक्त,  मंत्री महोदय  यांच्याकडे देखील वारंवार मागण्या करत आहेत. पनवेल पालिका हद्दीत वाढत्या कोरोना मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना देखील याची बाधा होत आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीसाठी अँटीजेन टेस्ट करण्यास 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई व पुणे महानगरपालिकेने १ लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट किटची खरेदी केलेली आहे. त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने किमान ५० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किटची खरेदी करावी. कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांची स्क्रीनिंंग करून संशयितांचे या रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातुन चाचणी करण्यात यावी. अशी आग्रही व महत्वाची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोक...