वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असे आमच्या संतानी सांगून ठेवले आहे. आमच्या पूर्वजानी वड, पिंपळ, तुळस सहित सर्वच झाडांना महत्व दिलेले आहे. झाडांमुळे पाऊस पडतो पाणी मिळते ,सावली मिळते, बाष्प टिकून रहाते, ऑक्सिजन मिळतो, भूजल पातळी राखली जाते, तापमानात घट होते झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय प्राणिजीवन नाही. जन्मानंतर व मृत्यूपर्यंत चालणारा श्वास हा आपल्या पृथ्वीतलावर वनस्पतीपासून मिळतो सर्वप्रणिमात्राना जीवन आवश्यक प्राणवायू हो झाडे आम्हाला देतात तर आम्हांस अपायकारक असणार CO2 कार्बनडाय ऑक्साइड हा विषारी वायू स्वताः शोषून घेउन सर्व प्राणिमात्रांवर हि वृक्ष संपत्ती दया करते आहे परंतु आमच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या वनदेवतेचा आम्ही सतत संहार करतो आहोत ते सुद्धा प्राथमिक गरजेपोटी नसून अधिकाअधिक लालसेपायी मानवजात जंगलांचा विध्वंस करत आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रगतशील युग म्हटले जात आहे. आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व यंत्रांच्या सहाय्याने विकास आणि प्रगती साधण्यासाठी जगात चढाओढ आहे हे...