Posts

नावे सध्या गुलदस्त्यात;  पवार-ठाकरे यांचं काय ठरलं?

Image
मुंबई,          विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची वर्णी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी चार जणांना संधी मिळणार आहे. ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चेअंती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही नावे सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर आणि आदेश बांदेकर ही दोन नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. ही नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्य हा कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातील असावा असा दंडक आहे. या निकषावर आपण निश्चित केलेले उमेदवार उजवे ठरावे व राज्यपालांकडून त्यावर कोणतीही हरकत घेतली जाऊ नये, हा प्रयत्न तिन्ही पक्षांचा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यकारभार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.       ...

• म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यामुळे संचारला उत्साह...  • शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उठले, प्रत्येक गावात काम टाकणार, यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फोफावणार • महादेव पाटील तालुका अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना वाढली.

Image
• म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यामुळे संचारला उत्साह...  • शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उठले, प्रत्येक गावात काम टाकणार,    यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फोफावणार • महादेव पाटील तालुका अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना वाढली. म्हसळा @ रायगड मत  raigadmat.page         गेले अनेक दिवस कोरोनामुळे राजकीय पक्षात शांतता होती, मात्र जसा कोरोना कमी होऊ लागला तसे राजकीय पक्ष आपली मोट पुन्हा बाहेर काढू लागले आहेत. म्हसळा तालुक्यात नगरपंचायतचे मतदान जवळ आले? तसे आढावा बैठकी, मेळावे व्हायला सुरुवात झाली.  raigadmat.page          आठ महिन्यानंतर शिवसेनेचा मेळावा झाला, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा झाला होता, बहुतेक आता काँगेसचा होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. मेळाव्याचा हेतू असतो कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा, उत्साह निर्माण करण्याचा. मात्र इथे झाले भलतेच इथे काम न आणणाऱ्या नेते लोकांवरच पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजले. त्यामुळे शिवसेनेमधील धुसफूस समोर आली. बरेच दिवस आतमध्ये काही तर शिजत होते मात्र या मेळाव्यात ते बाहेर आले. मात्र याम...

तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ; प्रवीण दरेकर

Image
रायगड : प्रतिनीधी          पेणमध्ये भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्च्यात तटकरेंवर टीका करताना दरेकर म्हणालेत, प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले जाते आहे. या विरोधात भाजपा रस्त्यावर उतरेल. सुडाचे राजकारण करत असताना तटकरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला. पोलिसांनी सारासार विचार न करता रात्री साडेबारा वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झडती घेतली. पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही स्तराला जाऊ शकतो हे तटकरेंनी यातून सिद्ध केले. याचा जाब विधानसभेच्या अधिवेशनात सरकारला विचारू.        एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करणे ही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची वृत्ती आहे. वीस-पंचवीस वर्षांत त्यांनी विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणले आहे. त्यांना आलेला सत्तेचा माज जनताच उतरवेल, अशी टीका भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.       ...

ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेतून राज्यपाल नियुक्त आमदार होणार?

Image
मुंबई, प्रतिनीधी           ऊर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा ऊर्मिलाच्या नावाची जोरदार चर्चा चालली. मात्र, सहाच महिन्यात ऊर्मिलाने कॉंग्रेसला सो़चिठ्ठी दिली. मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती.           राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.             आता पुन्हा ऊर्मिलाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्...

पवारांना पश्चात्ताप होतोय का ? ; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Image
मुंबई : प्रतिनीधी            हा अहवाल पाहिला तर त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या २८ नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३० डिसेंबरच्या शपथविधीची छायाचित्रे आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे असे सरकार सत्तेवर आणल्याचा पश्चात्ताप होतो का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे .           राज्यपालांनी पाठविलेल्या कार्य अहवालावर शरद पवार  यांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्रे  आहेत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे.           घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे र...

कोकणात ठाकरे आणि राणे कुटुंबात वादाला सुरुवात ; सभापती भाजपात

Image
सिंधुदुर्ग, प्रतिनीधी           शिवसेनेला कुडाळमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत आता भाजपची सत्ता आली आहे. वैभव नाईक हे सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातच नितेश राणेंनी शिवसेनेला जबर धक्का दिला. वैभव नाईक यांच्या मतदारसंघातच सेनेला सुरुंग लागल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे.          शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून ठाकरे आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. आता याचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटताना दिसत आहेत. शिवसेना आमदार वैभव नाईक  यांच्या कुडाळ मालवण मतदारसंघातच भाजप आमदार नितेश राणे   यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यात अनेक वेळा थेट लढत पाहायला मिळाली आहे.         नूतन आईर यांच्यासह रांगणा त...

महाजन म्हणाले, खडसे गेल्याने फरक पडणार नाही

Image
जळगाव, प्रतिनीधी          एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचा दावा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते         कारण, एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पक्षबांधणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीकडे नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले.         एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या ठिकाणी भाजपकडून बैठका घेण्यात आल्या. गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपकडून पक्षबांधणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तुरळक स्थानिक कार्यकर्त्यांनीच हजेरी लावली. माजी मंत्री आणि एकनाथ खडसे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. मुक्ताईनग...