Posts

निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक  सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर....  संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान.... 

Image
निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर.... संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान....  म्हसळा (खरसई) / हेमंत पयेर          संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे अनेक समाजउपयोगी कार्य करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर संपन्न झाले        निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा सेक्टर मार्फत आपात्कालिन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवार  सकाळी 11 ते 2 या वेळेत खरसई येथील संत निरंकरी सत्संग भवन येथे शिबिराचे आयोजन केले होते.        याप्रसंगी कोविड - 19 ची परिस्थिती लक्षात घेता सदर शिबिरात जास्तित जास्त रक्तदात्यांनी उपस्थित होते. तसेच मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवुन प्रत्येकाने व्यवस्थेला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सनिटायजरचा वापर करत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन रायगड झोन (40 अ) चे झोनल इंचार्ज प...

मी होतो तेव्हा शिवसेना होती. म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याचा बार फुसका, म्हसळयात शिवसेना संपली, तटकरेनी ती संपवली - कृष्णा कोबनाक • सत्तेत नसतानाही मी कामे करीत आहे. एकदा आमदार होऊ द्या मग दाखवतो माझी ताकद - कृष्णा कोबनाक 

Image
• मी होतो तेव्हा शिवसेना होती. म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याचा बार फुसका, म्हसळयात शिवसेना संपली, तटकरेनी ती संपवली - कृष्णा कोबनाक • सत्तेत नसतानाही मी कामे करीत आहे. एकदा आमदार होऊ द्या मग दाखवतो माझी  ताकद  - कृष्णा कोबनाक  म्हसळा (प्रतिनिधी) @raigadmat.page        म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता तो अतिशय अल्प पदाधिकारी यांच्या समवेत. राज्यात सरकार असून ही शिवसैनिक निराश. राज्यात सत्ता मिळावी म्हणून एकत्रित व मतदारसंघात एकला चला रे? काय ही अवस्था. महा विकास आघाडी सरकार हे जनतेच्या भल्या साठी स्थापन झाले नसून सर्व भ्रष्टाचारी नेते एकत्रित येऊन आपली प्रकरणेही भविष्यात बाहेर येऊ नयेत म्हणून राजकीय आश्रय घेण्यासाठी एकत्र आले आहेत. अशा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शिवसेने कडून विकास कामांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. विकासच विसरले आहेत ते, हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच आप आपसात भांडणे करुन पडणार आहे. स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोबत म्हणजे आमच्या...

टायर फुटल्याने गाडीला अपघात; एकनाथ खडसे सर्व सुरक्षित

Image
जळगाव ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अंमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावजवळ अपघात झाला. स्वतः खडसे यांनी आपल्या ट्विटरवरून ही दिली. खडसे यांनी लिहिले – आज अंमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावजवळ माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने व चालकाच्या प्रसंगावधाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही. खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेची उमेदवारी व मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टीव्हीच्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीत म्हटले आहे की, खडसे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.

मोदी सरकारला जीएसटीतून 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला

Image
नवी दिल्ली (प्रतिनिधी)             ऑक्टोबर केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्राला 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये सीजीएसटीमधून मिळालेल्या 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून मिळालेल्या 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 274 कोटी रुपयांचा समावेश आहे. तर सेसच्या माध्यमातून सरकारला 8 हजार 11 कोटी रुपये मिळाले आहेत.            कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मार्चमध्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा फैलाव होउ नये म्हणून प्रवास, उद्योगधंद्यांवर निर्बंध लादण्यात आले याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. उद्योगधंदेच ठप्प झाल्यानं केंद्राला मिळणार्‍या महसुलात प्रचंड मोठी घट झाली. त्यामुळे राज्यांना मिळणारा जीएसटीतील हिश्श्याची भरपाई करणं सरकारसाठी अवघड झालं. मात्र आता केंद्र सरकारला मोठा दिलासा मि...

खडसे यांची विधानपरिषदेची आमदारकीची संधी धोक्यात ?

Image
मुंबई :          भाजपा सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यांचे नाव आमदारकीसाठी निश्चित मानले जात आहे. मात्र, दमानिया यांच्या तक्रारीमुळे वांधा होण्याची शक्यता आहे.         एकनाथ खडसे भ्रष्टाचारी आहेत; त्यांना आमदार करू नका, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया  यांनी राज्यपालांना केली आहे. यामुळे खडसे यांची विधानपरिषदेची आमदारकीची संधी धोक्यात येण्याची शक्यता आहे.         खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला व याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरूद्ध तक्रार दाखल केली आहे, असे सांगितले.        खडसे यांच्याविरुद्ध राज्यपालांना दिलेल्या निवेदनात दमानिया यांनी म्हटले आहे की, खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्याबाबत वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमद...

काश्मीरात तिरंगा फडकेल का?; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

Image
मुंबई :            काश्मीरमध्ये तिरंगा फडकू देणार नसल्याचं विधान पीडीपीच्या अध्यक्षा मेबबूबा मुफ्तींनी केलं. त्यानंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटकदेखील झाली. गृह मंत्रालयानं एक अधिसूचना प्रसिद्ध करत देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीला काश्मीरमध्ये जमीन खरेदीची परवानगी दिली. 370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही. कश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. कश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊतांचा ‘रोखठोक’ : मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे कश्मीरातील 370 कलम उडवून लावले. ’35 अ’ कलम संपवले. लडाखला जम्मू-कश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित...

ओएनजीसी महामार्गावरील खड्डे सुरक्षा रक्षकांनी बुजविले

Image
पनवेल : राज भंडारी           पनवेल शहरालगत जाणाऱ्या मुंबई पुणे - गोवा महामार्गावरील ओएनजीसी येथील सिग्नल जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे संबंधित विभागाला दिसून येत नसल्यामुळे अखेर शनिवारी येथील ओएनजीसी कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी हे खड्डे स्वकर्तुत्वाने भरून काढले आहेत.           मुबई पुणे - गोवा जुना हायवे लगत  ओएनजीसी  गेट सिग्नल जवळ खुप मोठे खड्डे पडले होते, त्यामध्ये बाईक स्वार खुप मोठ्या प्रमाणात पडून जखमी होत होते तसेच महिला लहान मुलांना गाडीवर घेउन दुचाकीस्वार पडले आहेत. शनिवारी सकाळी एक बाईक सवार पडला व त्याच्या चेहऱ्यावर तसेच डोक्याला मार लागला आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहता येथील सामाजिक कार्यकर्ते बाळाराम चिखलेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बळ  ओएनजीसी गेट यांच्या साहाय्याने सदरचे खड्डे  बुजवण्यात आले. सदरचे खड्डे बुजवण्यात आल्यामुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून ओएनजीसी सुरक्षा रक्षकांचे आभार मानण्यात आले.