Posts

श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन

  श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन   पनवेल(प्रतिनिधी) श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उदघाटन मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर (गुरुवार, दि. १४) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवाप्रमुख शिरीष देशमुख, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, अभियान प्रमुख राजीव बोरा, अभियान सहप्रमुख गौरव जोशी, महिला संपर्क प्रमुख स्वाती कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.            अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य 'श्रीराम मंदिर' साकारणार आहे. त्या अनुषंगाने देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरु होणार असून पनवेल नगरीतील संपर्क व निधी' संकलन कार्यालय गंगाकावेरी सोसायटी, गोदरेज प्लाझा समोर टिळक रॉड येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.             ...

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय

Image
  दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल  पनवेल(हरेश साठे) गोर गरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे, असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.         ०२ जून २०२१ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस आहे. यानिमीत्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची पहिली बैठक पार पडली.      माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर ...

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : भाजपच नंबर वन - महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था

Image
  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक :  भाजपच नंबर वन - महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था    पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने  घवघवीत  यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. एकूणच या निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.  गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पालीदेवद, वाजे, खानाव, ग्रामपंचायतीत भाजपने कमालीची कामगिरी करत बाजी मारली.  त्यामुळे शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे. विजयासाठी भाजपच्या त्या-त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.   सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लो...

नवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.चंद्रप्रताप प्रजापती, श्री.अरविंदपाल व श्री.राकेश रंजन यांनी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे आयोजित केलेल्या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनीभेट दिली व केक कापून आश्रमातील वृद्धांना भरविले तसेच खाऊ वाटप केले.

Image
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.चंद्रप्रताप प्रजापती, श्री.अरविंदपाल व श्री.राकेश रंजन यांनी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे आयोजित केलेल्या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनीभेट दिली व केक कापून आश्रमातील वृद्धांना भरविले तसेच खाऊ वाटप केले.  

१६ जानेवारीपासून देशभर होईल कोरोना लसीकरण... - Raigad Tourism

Image
Breaking News -    १६ जानेवारीपासून देशभर होईल कोरोना लसीकरण...  नवी दिल्ली :     आठवड्याभरानं अर्थात १६ जानेवारीपासून देशभरात करोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना लसीकरण मोहिमेसंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आलीय.   पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्या जुन्या आजारानं त्रस्त असलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.     पंतप्रधानांकडून या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी कॅबिनेट सेक्रेटरी, आरोग्य सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन करोना योद्ध्यांना प्राथमिकता देत लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्य...

लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार

Image
 लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार  पोलादपूर : तालुक्यातील कुडपण गावाजवळ पाथरी खिंडीमध्ये एका वळणावर लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे १५० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे, तर ६१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळा उरकून वरपक्ष नववधूला साताऱ्याहून खेड येथे घेऊन येत असताना हा अपघात घडला. अपघातातील जखमींना महाड, पाेलादपूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. सातारा जिल्ह्यातील कुमटे-काेंडाेशी येथून लग्नकार्य आटपून वऱ्हाड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-खवटी येथे परतत हाेते. पात्री खिंडीतून परतत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता आहे. विठ्ठल बक्कु झोरे (६५, रा. खवटी ता. खेड), तुकाराम दत्तू झोरे (४०,रा. कावले, कुंभारडे ता. महाड), भावेश हरिश्चंद्र होगाडे (२३, रा. तुळशी धनगर वाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. घटनास्थळी पाेलादपूर पोलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक प्रशांत...

विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती

Image
  विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती नागरिकांनी मानले विरोधी पक्ष प्रीतम म्हात्रे आणि नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार   नवीन पनवेल  :  पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कळंबोली गावात प्रवेश करण्यासाठी वापरात असलेल्या प्रवेश द्वारावरील रस्ते दुरुस्ती केली जात नसल्याने नाराज असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे तसेच स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार मानले आहेत.              प्रभाग क्रमांक  10  मध्ये मोडणाऱ्या कळंबोली गावात प्रवेश करण्यासाठी वापरात असलेल्या कळंबोली प्रभाग कार्यालयाकडील रस्ता ,  सद्गुरू बेठक सभागृहकडे जाणारा रस्ता तसेच जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती.   प्रवेश द्वारावरच झालेली ही दुरावस्था दुर करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाकडे व स...