Posts

पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवस.

Image
  पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंडेवहाळ येथील जे.एम.म्हात्रे इन्फ्रा कार्यालयात रस्ता-सुरक्षा अभियान अंतर्गत कामगारांना सुरक्षेचे प्रशिक्षण तसेच वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त सुरक्षा प्रशिक्षणाचे उद्घाटन करून वृक्ष रोपण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांनी आणलेला केक कापून कंपनीतील कर्मचारी तसेच कामगार व कामगारांच्या मुलांसमवेत वाढदिवस साजरा केला.

पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच वाढदिवस.

Image
  पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिपक लॅबोरेटरी व निओ क्लिनिक आणि एको सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे मोफत वैद्यकीय चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यानिमित्त या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनी भेट देऊन श्री.दिपक कुदळे, डॉ.निलेश बांठिया, सौ.हेमलता कुदळे तसेच लॅब टेक्निशियन यांचे आभार मानले. यावेळी श्री.दिपक कुदळे व सहकाऱ्यांनी केक भरवून वाढदिवस साजरा केला.

श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन

  श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन   पनवेल(प्रतिनिधी) श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उदघाटन मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर (गुरुवार, दि. १४) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवाप्रमुख शिरीष देशमुख, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, अभियान प्रमुख राजीव बोरा, अभियान सहप्रमुख गौरव जोशी, महिला संपर्क प्रमुख स्वाती कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.            अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य 'श्रीराम मंदिर' साकारणार आहे. त्या अनुषंगाने देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरु होणार असून पनवेल नगरीतील संपर्क व निधी' संकलन कार्यालय गंगाकावेरी सोसायटी, गोदरेज प्लाझा समोर टिळक रॉड येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.             ...

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय

Image
  दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल  पनवेल(हरेश साठे) गोर गरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे, असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.         ०२ जून २०२१ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस आहे. यानिमीत्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची पहिली बैठक पार पडली.      माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर ...

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : भाजपच नंबर वन - महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था

Image
  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक :  भाजपच नंबर वन - महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था    पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने  घवघवीत  यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. एकूणच या निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.  गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पालीदेवद, वाजे, खानाव, ग्रामपंचायतीत भाजपने कमालीची कामगिरी करत बाजी मारली.  त्यामुळे शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे. विजयासाठी भाजपच्या त्या-त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.   सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लो...

नवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.चंद्रप्रताप प्रजापती, श्री.अरविंदपाल व श्री.राकेश रंजन यांनी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे आयोजित केलेल्या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनीभेट दिली व केक कापून आश्रमातील वृद्धांना भरविले तसेच खाऊ वाटप केले.

Image
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.चंद्रप्रताप प्रजापती, श्री.अरविंदपाल व श्री.राकेश रंजन यांनी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे आयोजित केलेल्या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनीभेट दिली व केक कापून आश्रमातील वृद्धांना भरविले तसेच खाऊ वाटप केले.  

१६ जानेवारीपासून देशभर होईल कोरोना लसीकरण... - Raigad Tourism

Image
Breaking News -    १६ जानेवारीपासून देशभर होईल कोरोना लसीकरण...  नवी दिल्ली :     आठवड्याभरानं अर्थात १६ जानेवारीपासून देशभरात करोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना लसीकरण मोहिमेसंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आलीय.   पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्या जुन्या आजारानं त्रस्त असलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.     पंतप्रधानांकडून या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी कॅबिनेट सेक्रेटरी, आरोग्य सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन करोना योद्ध्यांना प्राथमिकता देत लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्य...