Posts

• अजहर धनसे प्रकरणात डीवाय एसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा आणि कर्मचारी पोलीस यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश ##कोर्टाचा आदेश : १) नि. क्र. ३ कडील दिनांक ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश. २) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश.

 • अजहर धनसे प्रकरणात  डीवाय एसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा आणि कर्मचारी पोलीस यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश कोर्टाचा आदेश :  १) नि. क्र. ३ कडील दिनांक  ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश.  २) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश.  म्हसळा-प्रतिनिधी        म्हसळा पोलीस ठाण्यात अजहर धनसे या युवकाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती.या प्रकरणात न्यायालयाने डीवायएसपी श्रीवर्धन व डीवाय एसपी रोहा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रायगड यांना दिले आहेत.      २५ एप्रिल २०१९ रोजी म्हसळा तालुक्यातील पांगलोली येथील युवक काही कारणास्त म्हसळा पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी तेथे  उपस्थित ९ पोलीस कर्मचार्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होई पर्यंत मारहाण केली होती. अजह...

रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन

Image
  रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन पनवेल : जे. एम. म्हात्रे चारीटेबल संस्था ,  पनवेल आणि निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्यातर्फे  19  फेब्रुवारी रोजी शेकाप जनसंपर्क कार्यालय ,  सेक्टर  10,  खांदा कॉलनी येथे रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.             19  फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शेकाप जनसंपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे सकाळी दहा ते चार या वेळेत रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर प्रीतम म्हात्रे ,  नवी मुंबईचे युवा नेते वैभव नाईक ,  नगरसेवक गणेश कडू ,  सौरभ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.    

महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

Image
  महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी ,  विरोधी पक्षनेते प्रि तम म्हात्रे यां च्या   मागणी ला यश पनवेल :  पनवेल महानगरपालिकेची महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात 18 फेब्रुवारी रोजी पार पडली. या सभेत महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी   देण्यात आली आहे. पालिका हददित आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी यापूर्वी केली होती. त्यांच्या या मागनीला यश आले आहे.          पनवेल महानगरपालिका हददित  यापूर्वी फक्त सहा आरोग्य केंद्र कार्यरत होते. त्यापैकी दोन आरोग्य केंद्र पनवेल शहरात ,  नवीन पनवेल ,  कळंबोली ,  खारघर ,  कामोठे अशी सहा आरोग्य केंद्र आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ,  नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर ,  प्रीती जॉर्ज ,  सारीका भगत हे  2018  पासून लेखी पाठपुरावा करत आहेत. या विषयाबाबत प्र शासनाने वेळोवेळी माहिती दिली...

सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी खासदार श्रीरंग बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले लोकार्पण सुंदर शिवसृष्टी उभारल्याबद्दल सभागृहनेते परेश ठाकूर यांचे कौतुक आणि आभारही

Image
  सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी  खासदार श्रीरंग बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले लोकार्पण  सुंदर शिवसृष्टी उभारल्याबद्दल सभागृहनेते परेश ठाकूर यांचे कौतुक आणि आभारही  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून,  मागणीतून आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून  पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला (दि. १८) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले.  सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी केलेल्या संकल्पना व पाठपुराव्या बद्दल त्यांचे यावेळी मान्यवरांसह पनवेलकरांनी कौतुक करण्यात आले.      या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभाग...

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रमांची सुरुवात

Image
  राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रमांची सुरुवात सभागृहनेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या उपक्रमांचे कौतुक. पनवेल(प्रतिनिधी) श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा येत्या २ जून २०२१ रोजी वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस व पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या उपक्रमांची सुरुवात दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत पनवेलमधील युनियन हॉटेल येथे गरीब - गरजू लहान मुलांना मिसळ  महोत्सवातून करण्यात आली. यावेळी परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, केवल महाडिक यांनी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्याप्र...

हळदी कुंकू समारंभ उत्साहात.

Image
  पनवेल मधील देवद गावातील पाटील कुटुंबियांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिलांना वाण देण्यासोबत महिला, लहानगे आणि ज्येष्ठ महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम नियोजनामध्ये झालेला हा समारंभ यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष मेहनत घेतली. 

हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

Image
  पनवेल : पनवेल येथील वैश्यवाणी- एक हात मदतीचा या संस्थेतर्फे वैश्य समाज हॉल ,  मिरची गल्ली पनवेल येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार  7  फेब्रुवारी  2021  रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.        या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रदीप (बापू) दलाल आणि उपाध्यक्ष हर्षदा तांबोळी यांनी केले आहे. या हळदीकुंकू समारंभचे खास आकर्षण म्हणजे स्टार प्रवाह मालिकेतील फुलाला सुगंध मातीचा मधील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे उपस्थित राहणार आहेत.