Posts

अल्पवयीन मुलांना दुचाकी व मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हे मध्यवर्ती शाखेने केले गजाआड

Image
 अल्पवयीन मुलांना दुचाकी व मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हे मध्यवर्ती शाखेने केले गजाआड पनवेल, दि.12 (संजय कदम) ः दुचाकी व मोबाईल चोरीच्या गुन्हयांमध्ये अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच्या घटना पोलिस तपासातून समोर येत असल्याने समाजासाठी ही निश्‍चिच धोक्याची बाब आहे. ताज्या घटनेत, नवी मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी दोघा अल्पयीन गुन्हेगारांना जेरबंद करून नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत या दुकलीने केलेले सात दुचाकी व सहा मोबाईल चोरीचे असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणत एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी व मोबाईल चोरीसह इतर गुन्हयांच्या घटनांत वाढ झाल्याची बाब लक्षात घेवून पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील व सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत...

पांडव कड्यासह इतर धबधब्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री

Image
 पांडव कड्यासह इतर धबधब्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पनवेल जवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येवू नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाणे कडून सर्व नागरिक व पर्यटक यांना जाहीर आव्हान करण्यात आले आहे की, खारघर मधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज, घामोळे गाव, ओवे कॅम्प डोंगर व धरण परिसर तळोजा जेल समोर डोंगर व तळोजा समोरील तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान-मोठे धबधबे चालू होतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा डोंगरावरून वाहणार्‍या पाण्यामुळे पांडवकडा, चाफेवाडी,फणसवाडी व ओवे काम धरण व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या धबधबा तयार होतात तेव्हा सदर ठिकाणावर दर शनिवार, रविवार, इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक या धबधब्याच्या धारेखाली बसण्यासाठी येथे जमा होतात. पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी जातात तेव्हा पाण्याच्या धबधब्या सोबत डोंगरावरील दगड घरंगळत येऊन बधब्...

दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू - गोवर्धन डाऊर यांचा आक्रमक इशारा

Image
 दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू - गोवर्धन डाऊर यांचा आक्रमक इशारा        दापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोवर्धन नामदेव डाऊर यांनी विमानतळाच्या नामकरण वादाबाबत आपली भूमिका मांडत असताना आक्रमकपणे राज्य सरकारला ठासून सांगितले आहे की,दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू.        नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली नसल्या कारणामुळे प्रकल्पग्रस्त बांधव आक्रमक झाले आहेत. गुरुवार दिनांक १० जून रोजी मानवी साखळी आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी राज्य शासनाला गर्भित इशारा दिला आहे. ये तो सिर्फ झाकी है २४ जून की टक्कर अभी बाकी है... असे म्हणत प्रकल्पग्रस्त बांधव आणि भूमिपुत्रांनी २४ जून रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी बाह्या सरसावल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने  गोवर्धन डाऊर यांच्याशी चर्चा केली असता पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्य...

वयोवृध्द इसमाला मारहाण करून जबरीने लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना उत्तर प्रदेश येथुन केले जेरबंद

 वयोवृध्द इसमाला मारहाण करून जबरीने लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना उत्तर प्रदेश येथुन केले जेरबंद  पनवेल, दि.11 (संजय कदम) ः एका वयोवृद्ध इसमास मारहाण करून लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी उत्तर प्रदेश येथून जेरबंद केले आहे.  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीतील अयप्पा मंदीर समोरील सेक्टर 13, नवीन पनवेल येथील जेष्ठ नागरीक बक शेखाजी दहातोंडे वय 85 वर्षे, यांना 3 अनोळखी इसमांनी त्यांचे दुकानामध्ये जबरदस्तीने घुसुन त्यांना लोखंडी पाईपने डोक्यावर मारहाण करून जखमी करून त्यांचे गळ्यातील 4 तोळ्याची सोन्याची चेन जबरीने खेचुन तसेच त्यांचेकडील ताब्यातील खाम जबरी चोल नेली म्हणुन खांदेश्‍वर पोलीस ठाणे, गुन्हा नोंद होता. वयोवृद्ध इसमास त्यांचे सहते ठिकाणी रात्रीच्यावेळी घुसुन त्यांना अशाप्रकारे जबर मारहाण करून त्यांचे कडील सोन्याचे दागिने व पैसे जबरीने लुटुन नेणे या घटनेची संवेदशीलता पाहता सदरचा गंभिर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ), डॉ . बी . जी . शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) ...

पनवेल गुन्हे शाखेकडून 14 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस ; सराईत गुन्हेगार गजाआड

Image
पनवेल गुन्हे शाखेकडून 14 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस ; सराईत गुन्हेगार गजाआड पनवेल, दि.11 (संजय कदम) ः मागील सहा महिन्यापासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ला यश आले आहे. पोलीस आयुक्त नवीमुंबई बी.के.सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्या मध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व अभिलेखा वरील जामिनावर सुटलेले गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने सहा.पो. आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेली वाहने, गुन्हा घडलेली वेळ व वार यांची माहिती संकलित करून तांत्रिक तपासा वरून ठाणे पोलिस आयुक्तालय अभिलेखा वरील सोनसाखळी चोरी मधील गुन्हेगार नामे फजल आयुब कुरेशी वय 25 वर्ष रा.ठी. रूम नंबर 4, टाटा पावर...

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे कळंबोली व कामोठे येथील जोड रस्त्याच्या कामाला सुरूवात

Image
 शिवसेनेच्या प्रयत्नामुळे कळंबोली व कामोठे येथील जोड रस्त्याच्या कामाला सुरूवात पनवेल, दि.11 (संजय कदम) ः  कळंबोली येथून कामोठ्यात जाण्याकरिता मोठा वळसा घालून जावे लागत होते. यामुळे पादचार्‍यांसह वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही गोष्ट लक्षात येताच शिवसेनेच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा करून खा.श्रीरंग बारणे यांनी विशेष लक्ष घालून ही समस्या सोडविली आहे. व प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. कळंबोलीमधून  कामोठे येथे जाण्याकरिता  शिवसेना  शाखे वरून मोठा वळसा घालून जावे लागते त्यामुळे  कामोठे व  कळंबोलीतील रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच पेट्रोल व डिझेलचा सुद्धा मोठया प्रमाणात अपव्यय होत असून त्याचा नाहक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच सध्या तेथून विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार हे रस्ता क्रॉस करतात त्यामुळे त्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होतच असतात. तरी भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष घालावे या करीता जिल्हा प्रमुख शिरीष घरत व म...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचा पाठींबा

Image
 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचा पाठींबा पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः  आगामी काळात होवू घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नावाला पाठींबा दिलेला आहे. दि.बा.पाटील यांनी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दि.बा.पाटील हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित जमीन मिळाली. दि.बा.पाटील यांच्या संघर्षामुळे सिडकोमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍यांना तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मजूर सहकारी संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना सिडकोच्या कामांचे टेंडर मिळाले. त्याचप्रमाणे सिडकोने संपादीत केलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांमध्ये नोकर्‍या मिळाल्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी वेचले त्यासाठी आंदोलने केली व आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. त्यांच्यामुळे आज आम्ही भूमीपुत्र ताठ मानेने जगत आहोत. तरी नवी मुंबई आंतराष्ट्रीय ...