Posts

शासकीय विविध दाखले शिबिरांचे आयोजन

  शासकीय विविध दाखले शिबिरांचे आयोजन  पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे व गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय विविध दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.         रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे शिबीर आयोजित झाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती पण आता ती दूर झाल...

म्हसळा तालुक्यातील आडी बौद्धजन व रोहिदास उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षारोपण करून जपली सामाजिक बांधिलकी !

Image
  म्हसळा तालुक्यातील आडी बौद्धजन व रोहिदास उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षारोपण करून जपली सामाजिक बांधिलकी ! म्हसळा :दिनेश काप  संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा संदेश "वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे वनचरे" हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणला तो आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळ यांच्या उत्साही कार्यकर्ते आणी स्थानिक मंडळानी.तसे पाहता आडी हे गांव श्रीवर्धन आणी म्हसळा यांच्या सीमेवर,डोंगरदऱ्यात  आणी निसर्गाने मनसोक्त उधळण केलेले आणी सुप्रसिध्द सावित्री नदीच्या काठावर वसलेले म्हसळा तालुक्यातील आदर्श असे आडी गांव होय.या गावचे वैशिष्ट म्हणजे गावातील बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांच्या प्रबोधन विचारसरणीतून गावांमध्ये बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांचे सयुक्त मंडळ होय.या मंडळाच्या माध्यमातून गेल्या वर्षी म्हणजे ०३ जून २०२० रोजी जे निसर्ग नामक महाभयंकर चक्रीवादळ आले त्या मध्ये रायगड जिल्ह्याचे फार मोठी वीत्य हानी झाली,अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले,शेकडो झाडे मुळासकट उमलून जमीनदोस्त झाली.ही हानी कधीही भरून न येणारी आहे.परंतु आडी गावातील बंधूंनी हार मानली नाही अगदी मोठ्या जोमा...

म्हसळा येथे १८६३ पासून सुरु असलेले ऐतिहासिक तहसील कार्यालय आता उभे राहणार नव्या जागेत • पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय... • जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आदेश. • रायगड मत आणि म्हसळा तालुक्यातील पत्रकारांनी लावून धरला होता नवीन इमारतीचा मुद्दा.

Image
म्हसळा येथे १८६३ पासून सुरु असलेले ऐतिहासिक तहसील कार्यालय आता उभे राहणार नव्या जागेत  • पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय...  • जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आदेश.  • रायगड मत आणि म्हसळा तालुक्यातील पत्रकारांनी लावून धरला होता नवीन इमारतीचा मुद्दा.   म्हसळा  :    म्हसळा तहसील कार्यालयाचे कामकाज सध्याच्या वास्तूत वर्ष 1863 पासून सुरु आहे. कार्यालयाची इमारत अत्यंत जुनी झाली होती. त्याची डागडुजी करण्यासही प्रमाणापेक्षा जास्त खर्च येत होता. तहसील कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ही जागा अपुरी पडत होती. या कार्यालयांतर्गत 84 महसूली गावे, 14 तलाठी तर दोन मंडळ अधिकारी कार्यालय कार्यरत आहेत. या सर्व अडचणींचा विचार करून यावर उपाय म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी म्हसळा तहसील कार्यालयाची नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने जागा देणेबाबतचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले होते. त्यानुसार म्हसळा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी जागा प्रदान करण्यात आली आहे. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यां...

कालकथित चंद्रकांत कांबळे, माजी भूमि अभिलेख अधिकारी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Image
  कालकथित चंद्रकांत कांबळे, माजी भूमि अभिलेख अधिकारी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्या वाटप  महाड तालुक्यातील केंबुर्ली  रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंबुर्ली येथे कालकथित चंद्रकांत बापूसाहेब कांबळे "माजी भूमीअभिलेख अधिकारी" यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना मोफत वह्या,छत्री ,वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. चंद्रकांत कांबळे साहेब यांचा गोर गरिबांनसाठी मदतीचा हात नेहमी पुढे असायचा  हे वडीलांचे समाजसेवाचे दृश्य डोळ्यासमोर ठेऊन   त्यांचा मुलगा प्रसेंजीत चंद्रकांत कांबळे यांनी वडिलांचा समाजसेवकाचा वारसा जपत शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्या  मोफत वाटप केल्या व संदेश निकम यांनी छत्री मोफत वाटप केली ,तसेच ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष-श्री. श्रीकांत कांबळे गुरुजी, मुख्याध्यापक -दीपाली बागडे ,कदम मॅडम ,जोशी मॅडम ,शिर्के सर , उपस्थित पाहुणे-  श्रीहर्ष कांबळे, सम्राट कांबळे, विनायक धोंडगे ,सुदेश निकम,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम शासनाच्या प्रशासकीय नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला बाईट मुख्याध्यापक, द...

विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी

Image
  विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या आवारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची मागणी एमआयएम महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. मुंबईतील विमानतळावर वाढत असलेला ताण व त्यामुळे आकाशात होणारी वाहतुक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यात नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू केलेले आहे. रायगडमधील जनतेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच जनतेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील या रायगडच्या सुपुत्रांचे नाव व कार्य परिचित आहे. या सुपुत्रांनी रायगडच्या भुमीत जन्म घेतला, ही आमची फार मोठी पुण्याई आम्ही समजतो व त्यांच्याच आदर्शावर वाटचाल करत जनसेवेचे कार्य आज  करत असल्याची हाजी शा...

दिबांच्या नावासाठी स्वातंत्र्यदिनाच्या डेडलाईन; अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार

Image
दिबांच्या नावासाठी स्वातंत्र्यदिनाच्या डेडलाईन; अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार    'फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा'    पनवेल(प्रतिनिधी) १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अन्यथा दुसऱ्या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने आज (गुरुवार, दि. २४ जून) लाखो आंदोलकांच्या साक्षीने सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला.        लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, या मागणीसाठी बेलापूर येथे सिडकोवर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व जाती धर्माचे समाज, विविध राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभागी घेऊन 'जय दिबा' असा एल्गार केला.  आणि 'फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा होईल, असा खणखणीत आवाजही...

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं - राज ठाकरे

Image
 नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं - राज ठाकरे    नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे.    आमदार प्रशांत ठाकूर तसंच इतरांनी भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.    “कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असं नाव मिळालं. नवी मुंबईच्या...