कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल (प्रतिनिधी): महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी सुमारे साडेआठ ते नऊ कोटी रुपयांच्या कामांना एकाच वेळी सुरुवात झाली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून रोडपाली-बौद्धवाडी येथील कासाडी नदी लगतच्या दगडांचे पिचिंग, कोपरा गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गावातील समाज मंदिराची डागडुजी व सुशोभीकरण, धामोळे गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ओवे गावातील गटार बांधकाम, पेठ गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बांधणे, पापडीचा पाडा येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारे, तसेच खुटुक बांधण आणि इनामपुरी येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकास...