Posts

जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून आत्महत्या जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटना आज मंगळवारी समोर आल्या आहेत . यात जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथिल ६२ वर्षीय तर पाचोरा तालुक्यातील जामने ( सार्वे ) येथिल २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे . जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे पहिल्या घटनेत माधवराव श्रावण कुंभार ( वय ६२ ) य वृध्द शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली . माधवराव कुंभार हे गावात कुंभार व्यवसाय करीत होते . तसेच त्यांची शेती असून त्यात देखील ते काम करीत असत . नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे . माधवराव यांच्या पश्चात पत्न , १ मुलगी व दोन मुले असा परिवार आहे . याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .   पाचोरा तालुक्यातील जामने ( सार्वे ) येथिल तरुण   शेतकरी   राहुल राजेंद्र पाटील ( वय २६ ) याने कपाशीचे अपेक्षित उत्पन्न न आ...

दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा 'तो' आरोप; नवाब मलिक म्हणाले...

Image
  दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा ' तो ' आरोप ; नवाब मलिक म्हणाले ...   मुंबई :   मंत्री   नवाब मलिक   यांच्या कुटुंबीयांनी अंडरवर्ल्डंशी संबंधित व्यक्तींकडून   कुर्ला   एलबीएस रोड येथे ३ एकर जमीन कवडीमोल भावाने घेतल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते   देवेंद्र फडणवीस   यांनी केला आहे . त्याचवेळी मलिक यांच्या अन्य चार मालमत्तांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला आहे . फडणवीस यांचे हे सारे आरोप फेटाळताना मलिक यांनी आपली बाजू माध्यमांपुढे ठेवली आहे . यात   वांद्रे   येथील एका प्लॅटची माहितीही मलिक यांनी दिली आहे .    कुर्ला एलबीएस रोड येथील जागेबाबत फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे ती अर्धवट आणि अर्धसत्य आहे . जमिनीचा जो काही व्यवहार झाला आहे तो कायदेशीर प्रक्रियेनुसारच झालेला आहे . फडणवीस राईचा पर्वत करून सारं काही सांगत आहेत . त्याची खुशाल चौकशी करा . त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही , असे मलिक यांनी स्पष्ट केले . फडणवीस यांन...