Posts

अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.

Image
• अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न. • आजच्या सुवर्ण दिवसा मुळे दिवेआगर  येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार-- उपमुख्यमंत्री अजित पवार  रायगड जिल्ह्यातील  श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी  सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्ह:प्रतिष्ठापना  हस्ते पूजा संपन्न झाली.  दिवेआगर येथील मंदीरातील गणेशाची सुवर्ण मुर्ती ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते गेल्या ९ वर्षांपूर्वी ती चोरट्यांनी चोरली होती. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता.  तेव्हापासुन दिवेआगर येथील महत्व काहीसं कमी झाल्याचे दिसून येत होते. दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली असून त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर कोणी सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी करायचा प्रय...

स्वछता  विषयक कर्मचाऱ्यांची गैरसोय ,पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रकारअनेक सुविधांपासून स्वच्छता दुत वंचित शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र

Image
स्वछता  विषयक कर्मचाऱ्यांची गैरसोय ,पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रकारअनेक सुविधांपासून स्वच्छता दुत वंचित शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र पनवेल, (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात नाही. स्वच्छता दूतांना मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने स्वच्छता विषयक कर्मचारी काम करतात. त्यांच्यामुळे पनवेल महानगराचे आरोग्य अबाधित राहते. कोरोना वैश्विक संकटामध्ये त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छता विषयक कामे केली. ते खऱ्या अर्थाने कोविड योध्दे आहेत. असे असताना मनपा क्षेत्रातील स्वच्छता दूतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वेळेत गणवेश दिला जात नाही. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर साधनांचाही अभाव दिसून येतो. अनेकदा...

कुडपण येथे कविसंमेलन उत्साहात साजरे

Image
 कुडपण येथे कविसंमेलन  उत्साहात साजरे # मिलिंद खारपाटील  महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून दि 14 नोव्हेंबर रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेकडून कुडपण येथील सुभेदार वाडा येथे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले कविसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सुभेदार सोनावणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी  प्रा.एल बी पाटील, अ वी जंगम ,संजय होळकर, मिलिंद खारपाटील, म का म्हात्रे,शीतल मालुसरे,  मंदाकिनी हांडे, शारदा खारपाटील, शीला भगत आदी कवींनी कविता सादर केल्या. जमलेल्या समस्त साहित्यप्रेमीनी जोरदार टाळ्या वाजवून कवितांना दाद दिली. सदर कविसंमेलनाचे अध्यक्ष साहित्यप्रेमी महादेव घरत हे होते. ऐतिहासिक, निसर्गरम्य परिसर पाहून धन्य झालो. यापुढे कुडपण  ला पुन्हा पुन्हा येऊ असेही ते म्हणाले.प्रास्ताविकात सुधीर शेठ म्हणाले की शूर भूमीतील हा कार्यक्रम आहे.येथील माती मस्तकाला लावा.कविसंमेलनाचे व्यवस्थापान महावीर चक्र कृष्णाजी सोनावणे चॅरिटी ट्रस्टकडून करण्यात आले होते.आभार रमेश स...

मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी - आमदार प्रशांत ठाकूर

Image
  मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी - आमदार प्रशांत ठाकूर                                                                                             पनवेल(प्रतिनिधी) केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भापच्यावतीने आज (दि. १२) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्...

पनवेलमध्ये विकासाचा झंझावात

Image
  पनवेलमध्ये विकासाचा झंझावात  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणाऱ्या तब्बल ३१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज (दि. १५) झाले आहे.        भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशिला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रुचिता लोंढे, निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, सुहासिनी शिवणेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, अतुल पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, य...

लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन

  लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन पनवेल(प्रतिनिधी) पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका लीना गरड यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.  पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर खारघर प्रभाग पाच मधून नगरसेविका म्हणून लीना गरड विजयी झाल्या. मात्र त्यांनी सतत उघडपणे पक्षविरोधी कारवाई केली आहे आणि तशा सातत्याने तक्रारी विभागातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षश्रेष्टींकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी लीना गरड यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या संदर्भात आज (दि. १६) निलंबन पत्र लीना गरड यांना पाठविण्यात आले आहे.         भाजपच्या नगरसेविका असतानाही लीना गरड यांनी महापालिकेच्या विविध सभांमध्ये विरोधी पक्षाला उघडपणे सहकार्य केले आहे. भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या असताना आपल्या स्वतःच्या खारघर फोरम या संस्थेला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भाजपाला सातत्याने कमी लेखत भारतीय जन...

वाळवटी गणातून शिवसेना मुसंडी मारणार, शिवसेना शाखा प्रमुख कर्याकर्त्याची सभा.पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले.

Image
वाळवटी गणातून शिवसेना मुसंडी मारणार, शिवसेना शाखा प्रमुख  कर्याकर्त्याची सभा.पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले.  श्रीवर्धन- दिं १८ ऑक्टों २० २१ आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीमध्ये वाळवटी गणातून राष्ट्रवादीला जोरदार धक्का मिळणार असून शिवसेना संघटना पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले आहेत मागिल  निवडणूकीत या गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते , मात्र यावेळी माजी जि. प. सदस्य अविनाष कोळंबेकर हे शिवसेनेत स्वगृही परतले आरेत त्या मुळे कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तालुका प्रमुख प्रतोषभाई कोलथरकर यांनी पक्षबांधणीसाठी कंबरकसली असून वाळवटी गणतून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा हक्काचा उमेदवार निवडून आणणार असा चंग बांधला आहे याच उद्देशाने विभाग प्रमुख गाजानन कदम, गणपत सोलकर.पप्पू करदेकर, शरद महाडीक,युवा सेना अधिकारी ओमकार शेलार ,यांना सभेचे आदेश देऊन सभा आयोजित करणात आली. माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली  चिखलप येथिल चंडीकादेवी मंदिर सभागृह येथे वाळवटी गणातील शिवसेनेचे पदाधिकारी शाखा प्रमुख ,कार्यकर्ते यांची स...