Posts

खान्देश्वर पोलिसांनी मिसिंग केस टाकल्यावर मिसिंग रिपोर्ट का दिला नाही? का लपवून ठेवला मिसिंग रिपोर्ट. 

 [ ] खाजगी कर्ज आणि बँक कर्जवाल्यांनी तगादा लावला म्हणून पनवेलमध्ये महिला गेली अचानक घर सोडून. ना सासरच्या लोकांना माहिती आहे, ना माहेरच्या लोकांना माहीती? मग कुठे गेली ही महिला? [ ] या महिलेची व मुलांची मिसिंग तक्रार दाखल केल्यावर ही महिला ज्या महिला आणि पुरुषासोबत सापडली ते आता 4 लाख रुपये मागत आहेत. [ ] तसे व्हाटसॅप म्यासेज त्यांनी केले आहेत. या अगोदर घरी येऊन मागितले होते पैसे. [ ] मुलांना घेऊन कुठे वेगळी राहत आहे? की तिला वेगळी राहण्यास कोण भाग पाडत आहे? कर्जवाल्यानी वेगळ्या मार्गाने किडन्याप तर केले नाही ना? [ ] खान्देश्वर पोलिसांनी मिसिंग केस टाकल्यावर मिसिंग रिपोर्ट का दिला नाही? का लपवून ठेवला मिसिंग रिपोर्ट. 

पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका*  

पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका*    *रावे ग्रामपंचायत सरपंचावर कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई*  पेण(प्रतिनिधी): पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांतील गैव्यवहार तसेच ग्रामनिधी, ग्राम पाणीपुरवठा निधी, ग्रामपंचायतीच्या नावे मिळणाऱ्या इतर रक्कमा तसेच शासकीय आणि आर्थिक अनियमितपणा असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम(1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) चे कलम 57(3) नुसार कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रावे ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या नाशिकेत पाटील यांना आदेश देत त्यांचे सरपंचपद  रद्द केले आहे. त्यामुळे पेण तालुक्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे.          पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायतीमध्ये एकूण 13 सदस्यीय संख्याबळ असून यामध्ये भाजपाचे निर्विवाद स्पष्ट बहुमत आहे, पण याच ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे, त्यातच पक्षातील अंतर्गत कलह आणि पक्षश्रेष्ठींचा दुर्लक्षितपणा, यामुळे अखेर सरपंच संध्या पाटील यांना आपले सरपंचपद...

 पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका

पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका*    *रावे ग्रामपंचायत सरपंचावर कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई*  पेण(प्रतिनिधी): पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांतील गैव्यवहार तसेच ग्रामनिधी, ग्राम पाणीपुरवठा निधी, ग्रामपंचायतीच्या नावे मिळणाऱ्या इतर रक्कमा तसेच शासकीय आणि आर्थिक अनियमितपणा असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम(1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) चे कलम 57(3) नुसार कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रावे ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या नाशिकेत पाटील यांना आदेश देत त्यांचे सरपंचपद  रद्द केले आहे. त्यामुळे पेण तालुक्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे.          पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायतीमध्ये एकूण 13 सदस्यीय संख्याबळ असून यामध्ये भाजपाचे निर्विवाद स्पष्ट बहुमत आहे, पण याच ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे, त्यातच पक्षातील अंतर्गत कलह आणि पक्षश्रेष्ठींचा दुर्लक्षितपणा, यामुळे अखेर सरपंच संध्या पाटील यांना आपले सरपंचपद...

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' कार्यक्रम संपन्न

Image
http:// पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला.  हा सोहळा नावडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.          या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, जिल्हा सदस्य पवन भोईर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर ठाकूर, जेष्ठ नेते रवींद्र खानावकर, नावडे शहर अध्यक्ष मदन खानावकर, उत्तर रायगड युवा मोर्चा अध्यक्ष मयूरेश नेतकर, पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, जितेंद्र का...

महाराष्ट्र दिनी पनवेलमध्ये अवतरणार परंपरा महाराष्ट्राची "जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे कलारसिकांना कार्यक्रमाची मेजवानी"

महाराष्ट्र दिनी पनवेलमध्ये अवतरणार परंपरा महाराष्ट्राची "जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे कलारसिकांना कार्यक्रमाची मेजवानी" पनवेल : जे एम म्हात्रे चॅरिटेबल  संस्था आणि सरगम संगीत अकॅडमी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल मधील हौशी कलाकारांनी एकत्र येऊन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये "परंपरा महाराष्ट्राची" या संगीतमय सुरांची  मेजवानी ठेऊन पनवेल करांसाठी एक आगळी वेगळी भेट देण्यात येणार आहे.      या कार्यक्रमा संदर्भात माहिती देताना सरगम संगीत अकॅडमी चे श्री नरेश पाटील यांनी सांगितले पनवेलमधील विविध क्षेत्रातील मग ते राजकारण, वैद्यकीय क्षेत्र अभियंता क्षेत्र गृहिणी शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हौशी कलाकारांना एकत्र घेऊन आम्ही आमच्या सरगम संगीत अकॅडमी च्या माध्यमातून पनवेल करांसाठी महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा मराठमोळा कार्यक्रम परंपरा महाराष्ट्राची हा करू इच्छितो ही संकल्पना आम्ही विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडे मांडली. या कार्यक्रमाला नृत्य दिग्दर्शन सु...

रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी यांचा स्तुत्य उपक्रम....शाळांना महा पुरुषांच्या प्रतिमा प्रदान

Image
  रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी यांचा स्तुत्य उपक्रम....शाळांना महा पुरुषांच्या प्रतिमा प्रदान माणगाव (प्रतिनिधी) या शाळेच्या कणाकणाशी जडले माझे नाते | काशी माझी हीच | रामेश्वरही येथे || या विचाराला स्मरून विद्यार्थ्यांनी दिनांक 03 जून 2020 रोजी रायगड जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाने अक्षरशः होत्याच न्हवत केल यामध्ये सार्वजनिक मालमतेसह शाळांचीही दुरवस्था झाली त्यामधे शाळेतील महापुरुषांच्या प्रतिमा मोडून पडल्या अशा वेळेस आज दिनांक -23.01.2022 रोजी रा. जि. प शाळा मांजरवणे मराठी निगूडमाळ तसेच सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे ता. माणगाव येथे सरस्वती विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थी व रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने 32 महापुरुष प्रतिमा प्रदान कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी निगूडमाळ शाळेचे शिक्षक कुलकर्णी सर,निगूडमाळ गावचे माजी अध्यक्ष श्री.गणू ठसाळ सरस्वती विद्या मंदिरचे शिक्षक श्री. भेदाटे सर, पाटील सर, पवार सर, राजन पाटील सर, भिवा पवार सर, प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रकाश धुमाळ साहेब समाजसेवक, अशोक कांबळे तसेच रायगड मी मराठी प...

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला...

Image
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला... म्हसळा (प्रतिनिधी) : दि.०९/०१/२०२२ वार रविवार रोजी प्रतिष्ठान च्या वतीने १२ जानेवारी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आल. रायगड जिल्हा मध्ये श्रीवर्धन - तालुका जसवली आदिवासी वाडी म्हसळा तालुका - लैप आदिवासी वाडी माणगाव तालुका - वडघर मुद्रे आदिवासी वाडी तळा तालुका - भांनग कोडं पंचक्रोशी येथे उपक्रमांतून किट मध्ये (१ ब्लेंकेट १विक्स डब्बी १आयडेक्स डब्बी व १ व्यासलीन डब्बी) वाटप करण्यात आले. प्रतिष्ठान चं घोष वाक्य नुसार वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा. या विचारा नुसार प्रतिष्ठानचे काम चालू आहे, असे उद्गार प्रत्येक तालुका मध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले. श्रीवर्धन मध्ये उपस्थित रायगड जिल्हा परिषद सदस्य मा. सौ. प्रगतीताई आदावडे. ग्रामपंचायत सदस्य, श्री शब्बीर भाई, सौ अश्विनी वैराग, सौ नंदिनी कातकर, उदयजी, मंगेशजी, व किशोरजी म्हसळा मध्ये सरपंच श्री अंकुश खडस, माजी सरपंच श्री मधुकर लाड, ग्रामसेवक गमरे साहेब, माणगाव...