Posts

कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश;  रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचा स्त्युत्य उपक्रम

  कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश;  रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचा स्त्युत्य उपक्रम पनवेल(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेल व इनरव्हील क्लब न्युं पनवेल यांनी अनेक स्त्यूत्य उपक्रम राबविले असून त्यातील विशेष भाग म्हणजे दुर्गम भागातील कष्टकरी नगर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वच्यासर्व म्हणजे ७५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व चिक्की वाटप करण्यात आले.          रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे अध्यक्ष प्रदीप डावकर यांनी क्लब करीत असलेल्या उपक्रमाची माहिती देवून या शाळेत दिवाळी पूर्वी आरोग्य शिबीर व शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे सांगितले. तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड यांनी पाहुण्यांचे शाल, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आभार मानले. यावेळी रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे सेक्रेटरी ला. पुष्पराज मेडणे, ला. विश्राम एकडे, इनरव्हील न्यु पनवेलच्या ला. सौ. डावकर, शाळा समिती अध्यक्षा सौ. प्राची पाटील, सदस्य सुनिल राठोड, मुख्याध्यापक दिपक कासारे, सहकारी शिक्षक अशोक नेटके, अनिता वाघमारे, शर्मिला उपरे व ग्रामस्थ उपस्थ...

बुधवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

प नवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या   चांगु काना ठाकूर   आर्टस् ,  कॉमर्स    अँड   सा यन्स    कॉलेज न्यू   पनवेल  ( स्वायत्त )  येथे  प् रथम ,  द्वितिय ,  तृतीय वर्ष   पदवी   व   पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा  बुधवार  दिनांक १ ३   जुलै   रोजी  सकाळी ११. ३०वाजता   जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून  आयोजित केला आहे.  या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सी.ए. डॉ.प्रदीप कामठेकर,  संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य  आमदार प्रशांत ठाकूर,  माजी महापौर मा. डॉ. कविता चौतमोल  उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे  अध्यक्ष अरुणशेठ भगत ,  व्हाईस चेअरमन वाय. टी. देश...

आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स "कोकण गौरव" क्रूझ मुंबईहून कोकणाकडे धावणार

Image
 आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स "कोकण गौरव" क्रूझ मुंबईहून कोकणाकडे धावणार !   मुंबई : "कोकण गौरव" हे कोकण प्रदेशातील प्रवासाची पुनर्परिभाषित करणारी पहिली रोपेक्स क्रूझ आहे.ह्या क्रूझची फेरी मुंबई ते काशीद आणि दिघी, रायगड अशी असणार आहे. ही आशियातील हाय-स्पीड क्राफ्ट (HSC2000) पहिली भारतीय रोपॅक्स क्रूझ आहे आणि ही गोवा गौरव क्रूझ प्रा. लि मध्ये बनवली जात आहे.   आयआरएस ध्वजाखाली बांधलेले हे अति-आधुनिक, विलासी हाय-स्पीड क्राफ्टचा प्रवासाचा वेळ ५.५0 तासांवरून ३ तासांपेक्षा कमी करेल, ४९ नॉटिकल मैल प्रवास करेल आणि हा या प्रदेशातील वाहतुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग असेल.   ही क्रूझ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ह्या क्रूझच्या एका फेरीतुन २६० प्रवासी, २० गाड्या आणि ११ मोटारसायकल घेऊन जाऊ शकतो आणि त्यात A/C, व्यवसाय आणि VIP वर्ग असतील. रसद, प्रवास, पर्यटन आणि मनोरंजनासाठी हे बहुउद्देशीय क्रूझ असेल. ह्या कार्यक्रमाला श्री. डॉ महेंद्र कल्याणकर, IAS (जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रायगड),श्री. गौतम प्रधान (मुख्य प्रवर्तक संचालक...

स्व.वैभव गजानन म्हात्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक कार्यक्रम "जे.एम.म्हात्रे कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी" 

  स्व.वैभव गजानन म्हात्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक कार्यक्रम "जे.एम.म्हात्रे कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी"       पनवेल : कोरोनाचा काळ आटोक्यात आल्यानंतर जून महिन्यामध्ये पनवेल, उरण मधील शाळा नियमितपणे सुरू झाल्या. गेल्या दोन वर्षातील काळ पाहता बऱ्याच पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम घेत असतात. याच सामाजिक बांधिलकीतून स्वर्गीय वैभव गजानन म्हात्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून आज उरणमधील जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मोरा या ठिकाणी वह्या चे  वाटप करण्यात आलं.          याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की पनवेल आणि उरण परिसरात जे.एम.म्हात्रे साहेबांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून प.म.पा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सतत सुरू असतात. त्यामध्ये शिक्षण विभागात गरजू गरीब विद्या...

विमानतळाला दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडू देणार नाही- आंदोलनात दुमदुमला गजर 

  विमानतळाला दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडू देणार नाही- आंदोलनात दुमदुमला गजर  दिबांच्या स्मृतिदिनी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समिती, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा उसळला जनसागर आता लढाई आरपारची करायची- लोकनेते रामशेठ ठाकूर  दिबांचे नाव ही केवळ मागणी नसून भूमीपुत्रांचा अट्टाहास आहे - आमदार गणेश नाईक भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही- दशरथ पाटील  पनवेल(हरेश साठे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा जोरदार गजर सिडको घेराव आंदोलनात सीबीडी बेलापूर येथे झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समिती, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा  जनसागर उसळला होता.          नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी आज शुक्रवार दिनांक २४ जून रोजी सिडको विरोधात घेराव आंदोलन झाले.   साडेबारा टक्क्यांचा कायदा दिबा पाटील यांच्यामुळेच अस...

दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन 

  दनशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन  पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आधारवड असलेले दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील पेंधर, ओवे, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, घोटचाळ, घोट, नागझरी, देवीचापाडा, पालेखुर्द या ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या एकूण ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.०२) करण्यात आले.         पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती 'अ' मधील पेंधर गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, प्रभाग क्रमांक ३ मधील ओवे गावात नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रभाग क्रमांक १ मधील धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटारे बांधणे, पिसार्वे गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे,...

खान्देश्वर पोलिसांनी मिसिंग केस टाकल्यावर मिसिंग रिपोर्ट का दिला नाही? का लपवून ठेवला मिसिंग रिपोर्ट. 

 [ ] खाजगी कर्ज आणि बँक कर्जवाल्यांनी तगादा लावला म्हणून पनवेलमध्ये महिला गेली अचानक घर सोडून. ना सासरच्या लोकांना माहिती आहे, ना माहेरच्या लोकांना माहीती? मग कुठे गेली ही महिला? [ ] या महिलेची व मुलांची मिसिंग तक्रार दाखल केल्यावर ही महिला ज्या महिला आणि पुरुषासोबत सापडली ते आता 4 लाख रुपये मागत आहेत. [ ] तसे व्हाटसॅप म्यासेज त्यांनी केले आहेत. या अगोदर घरी येऊन मागितले होते पैसे. [ ] मुलांना घेऊन कुठे वेगळी राहत आहे? की तिला वेगळी राहण्यास कोण भाग पाडत आहे? कर्जवाल्यानी वेगळ्या मार्गाने किडन्याप तर केले नाही ना? [ ] खान्देश्वर पोलिसांनी मिसिंग केस टाकल्यावर मिसिंग रिपोर्ट का दिला नाही? का लपवून ठेवला मिसिंग रिपोर्ट.