Posts

सीकेटी महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेत देदीप्यमान यश

Image
सीकेटी महाविद्यालयाचे   मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेत देदीप्यमान यश पनवेल(प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय १६ व्या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  चांगु काना ठाकूर आर्टस्  , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज ,  न्यू पनवेल (स्वायत्त)   ला   शिक्षक दिनाच्या औचित्य साधून ओव्हरऑल रनर चॅम्पियनशिप ट्रॉफीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील व अविष्कार संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सीमा कोकितकर यांनी सन्मान स्विकारला.          संशोधन स्पर्धेत महाविद्यालयाने ०२ सुवर्ण, ०१ कांस्य याबरोबर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. ज्यामध्ये रसायनशास्त्र विभागाचे संशोधन विद्यार्थी अमोल पिंजरकर यांना प्रो.डॉ.बी.व्ही.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधन विद्यार्थिनी राजगुरू बिंदू यांना  डॉ...

कोकण-डायरी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस विशेषांकाचे केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडून कौतुक*

Image
पनवेल /कोकण डायरी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी कोकण-डायरीच्या जन्मदिनाच्या संन्यस्थ योद्धा विशेषांकाचे कौतुक केले. मुंबईत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयात डॉ.भागवत कराड यांनी कोकण-डायरीच्या अंकाच्या एकूण मांडणी आणि लेखनशैलीची खुप प्रशंसा केली. संपादक सय्यद अकबर यांना त्यांनी पंतप्रधान मोदीजी यांच्यावरील दर्जेदार वाढदिवस विशेषांक काढण्याबद्दल प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.यावेळी कोकण डायरीचे कार्यकारी संपादक किरण बाथम देखील उपस्थित होते.  महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयात राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कोकण-डायरीच्या विशेषांकाचे अभिनंदन केले.

राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२; रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले महाराष्ट्रात अव्वल स्थान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन 

  राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२; रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले महाराष्ट्रात अव्वल स्थान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन  पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ पटकाविला आहे.  त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबई मधील एकमेव विद्यालय ठरले आहे.           भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी राज्यातील ९३. ९८ शाळांनी सहभाग घेतला होता. त्याचे मूल्यमापन करून जिल्ह्यांनी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रतिजिल्हा १४ शाळांचे नामांकन केले होते. त्यानुसार शाळांचे राज्यस्तरीय मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये ग्रामीण प्राथमिक व माध्यमिक आणि शहरी प्राथमिक, माध्यमिक तसेच उपश्रेणी असे विभाग होते. त्या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून स्वच्छ विद्यालयांची यादी प्रसिद्...

यावर्षी 280 हून अधिक स्टील कंपनीचा पुरस्कारा सोहळ्यात होणार सहभागी दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉल येथे

  भारतीय पोलाद उद्योगाला प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी  'SUFI Steel Award'  चे आयोजन यावर्षी  280  हून अधिक स्टील कंपनीचा पुरस्कारा सोहळ्यात होणार सहभागी दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ,  इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉल येथे ऑगस्ट  2022,  मुंबई भारतीय पोलाद उद्योगाला प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी  'SUFI Steel award' (Steel Users Federation of India) चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी  280  हून अधिक स्टील कंपन्यांनी पुरस्कार सोहळ्याच्या विविध श्रेणींमध्ये सहभाग घेतला आहे.  भारत सरकार पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून स्थिर विक्रीच्या वाढीस हातभार लावत आहे. सर्व स्टिल स्टॉकहोल्डर्साठी एक व्यासपीठ प्रदान करून स्टिल पॉलिसी  2017  चे उद्दिष्ट साध्य करणे हा सुफीचा मुख्य हेतू आहे. या धोरणानुसार , 2030  पर्यंत  300  दशलक्ष टन उत्पादन आणि  160  किलो/हेड वापरण्याचे सूफीचे लक्ष्य आहे.  'SUFI Steel award'  हा सुफीने आयोजित केलेला एक उपक्रम आहे जेणेकरून स्टिल इंडस्ट...

कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश;  रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचा स्त्युत्य उपक्रम

  कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश;  रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचा स्त्युत्य उपक्रम पनवेल(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेल व इनरव्हील क्लब न्युं पनवेल यांनी अनेक स्त्यूत्य उपक्रम राबविले असून त्यातील विशेष भाग म्हणजे दुर्गम भागातील कष्टकरी नगर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वच्यासर्व म्हणजे ७५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व चिक्की वाटप करण्यात आले.          रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे अध्यक्ष प्रदीप डावकर यांनी क्लब करीत असलेल्या उपक्रमाची माहिती देवून या शाळेत दिवाळी पूर्वी आरोग्य शिबीर व शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे सांगितले. तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड यांनी पाहुण्यांचे शाल, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आभार मानले. यावेळी रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे सेक्रेटरी ला. पुष्पराज मेडणे, ला. विश्राम एकडे, इनरव्हील न्यु पनवेलच्या ला. सौ. डावकर, शाळा समिती अध्यक्षा सौ. प्राची पाटील, सदस्य सुनिल राठोड, मुख्याध्यापक दिपक कासारे, सहकारी शिक्षक अशोक नेटके, अनिता वाघमारे, शर्मिला उपरे व ग्रामस्थ उपस्थ...

बुधवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

प नवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या   चांगु काना ठाकूर   आर्टस् ,  कॉमर्स    अँड   सा यन्स    कॉलेज न्यू   पनवेल  ( स्वायत्त )  येथे  प् रथम ,  द्वितिय ,  तृतीय वर्ष   पदवी   व   पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा  बुधवार  दिनांक १ ३   जुलै   रोजी  सकाळी ११. ३०वाजता   जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून  आयोजित केला आहे.  या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सी.ए. डॉ.प्रदीप कामठेकर,  संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य  आमदार प्रशांत ठाकूर,  माजी महापौर मा. डॉ. कविता चौतमोल  उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे  अध्यक्ष अरुणशेठ भगत ,  व्हाईस चेअरमन वाय. टी. देश...

आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स "कोकण गौरव" क्रूझ मुंबईहून कोकणाकडे धावणार

Image
 आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स "कोकण गौरव" क्रूझ मुंबईहून कोकणाकडे धावणार !   मुंबई : "कोकण गौरव" हे कोकण प्रदेशातील प्रवासाची पुनर्परिभाषित करणारी पहिली रोपेक्स क्रूझ आहे.ह्या क्रूझची फेरी मुंबई ते काशीद आणि दिघी, रायगड अशी असणार आहे. ही आशियातील हाय-स्पीड क्राफ्ट (HSC2000) पहिली भारतीय रोपॅक्स क्रूझ आहे आणि ही गोवा गौरव क्रूझ प्रा. लि मध्ये बनवली जात आहे.   आयआरएस ध्वजाखाली बांधलेले हे अति-आधुनिक, विलासी हाय-स्पीड क्राफ्टचा प्रवासाचा वेळ ५.५0 तासांवरून ३ तासांपेक्षा कमी करेल, ४९ नॉटिकल मैल प्रवास करेल आणि हा या प्रदेशातील वाहतुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग असेल.   ही क्रूझ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ह्या क्रूझच्या एका फेरीतुन २६० प्रवासी, २० गाड्या आणि ११ मोटारसायकल घेऊन जाऊ शकतो आणि त्यात A/C, व्यवसाय आणि VIP वर्ग असतील. रसद, प्रवास, पर्यटन आणि मनोरंजनासाठी हे बहुउद्देशीय क्रूझ असेल. ह्या कार्यक्रमाला श्री. डॉ महेंद्र कल्याणकर, IAS (जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रायगड),श्री. गौतम प्रधान (मुख्य प्रवर्तक संचालक...