Posts

आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन 

आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन  लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण  आमदार महेश बालदी सुद्धा यात्रेकरूंसोबत यात्रेला  पनवेल(हरेश साठे) आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील १२५० आदिवासी बांधवांना २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मथुरा अयोध्या काशी या तीर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे.  त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरूंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.            यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्...

पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या निसर्ग पर्यटन आराखड्याच्या संदर्भात आज (दि. १९) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे वने मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक संपन्न झाली.

   पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या निसर्ग पर्यटन आराखड्याच्या संदर्भात आज (दि. १९) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे वने मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक संपन्न झाली. यावेळी उत्तम असा कर्नाळा पक्षी अभयारण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी देऊन आराखड्याबद्दल मार्गदर्शक सूचना संबंधित विभागाला दिल्या. यावेळी वन विभागाचे प्रमुख अधिकारी व तसेच कर्नाळा विभागातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर 

Image
    गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर     गावाचा विकास करा निधीची कमतरता पडणार नाही- आमदार महेश बालदी     कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जिंकायचीच- बाळासाहेब पाटील  पनवेल(हरेश साठे) भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. २४) येथे केले.        देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास म...

फेस्टिवल ऑफ ड्रीम्स कॅम्पेनमध्ये आकर्षक ऑफर्सची मेजवानी

पनवेल(प्रतिनिधी)  क्रोमाच्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्स ,  न्यू इयर सेल मध्ये आकर्षक ऑफर्सची मेजवानी मिळणार आहे. या निमिताने आनंदाने आणि उत्साहाने सरत्या वर्षाचा निरोप घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.       भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक सदस्य क्रोमाने उत्पादनांच्या सर्व श्रेणींमध्ये ग्राहकांच्या आवडीच्या गॅजेट्स व उपकरणांवर आकर्षक ऑफर्स सुरु केल्या आहेत. लॅपटॉप्स ,  मोबाईल फोन ,  घरगुती उपकरणे ,  टीव्ही आणि इतर अनेक उत्पादनांची खरेदी करण्याची आपली स्वप्ने पूर्ण करण्याची उत्तम संधी क्रोमामध्ये मिळत आहे. सुट्ट्यांच्या संपूर्ण सीझनमध्ये २ जानेवारी २०२३ पर्यंत क्रोमाच्या स्टोर्समध्ये आणि  croma.com   वर हा सेल सुरु राहणार आहे.          ख्रिसमस आणि नवे वर्ष या दोन्ही निमित्ताने भरपूर आनंद साजरा केला जातो.  ' सीक्रेट सांता '  खेळण्यापासून आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आवडीच्या भेटवस्तू खरेदी करण्यापर्यंत ग्राहकांच्या सर्व इच्छा ,  आकांक्षा ,  गरजा पूर्ण क...

शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा डोअर टू डोअर प्रचार

 शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा डोअर टू डोअर प्रचार. उरण, (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी आहे.गावच्या सर्वागीण विकासासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिव समर्थ परिवर्तन आघाडी स्थापन करून गावच्या विकासासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे.पागोटे गावात प्रत्येक वार्डात शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा जोरात प्रचार सुरु आहे. हुतात्म्यांना अभिवादन करून सुरु झालेल्या शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या प्रचाराला जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या सरपंच पदासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीचे कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी), वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार सुजित हसुराम तांडेल (निशाणी बॅट ), समृद्धी तुळशीराम तांडेल(निशाणी कपाट ), सतीश ज्ञानेश्वर पाटील (निशाणी ऑटोरिक्षा), तर वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार करिश्मा गणेश पाटील (निशाणी टेबल ), प्राजक्ता हेमंत पाटील (निशाणी बॅट), अधिराज किशोर पाटील (निशाणी कपाट), आणि वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार सोनाली दिनेश भोईर...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Image
 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू उरणः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूरच्या एका खासगी क्लासचे हे सर्व विद्यार्थी आहेत. या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. जखमी विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋतिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मुंबईतील चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी बसने मुंबईकडे परतत असताना, बोरघाटातील मॅजिक पॉइंटजवळ या खासगी बसला अपघात होऊन ती उलटली. यावेळी या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे,...

‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ- आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

Image
       ‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ-   आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार पनवेल (प्रतिनिधी )रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी कामोठे येथे काढले.         रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा वाढदिवस आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्यास यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रायगड विभाग कामोठे पनवेलच्या वतीने ४० हजार स्क्वेअर फुटी महारांगोळी तसेच खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार दिलीप-वळसे पाटील यांच्या ह...