Posts

मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी # मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने

  मराठी केवळ भाषा नव्हे ,  आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने   मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे ,  आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी ,  वाक्प्रचार ,  अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या.  मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी ,  ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे  मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ,  दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही  म्हणाले की ,  मराठी प्...

भाजपा, सांस्कृतिक सेल तर्फे आयोजित "माय बोली साजिरी" अभिवाचनात्मक आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध 

भाजपा सांस्कृतिक सेल तर्फे आयोजित "माय बोली साजिरी" अभिवाचनात्मक आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध  पनवेल(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्याने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगरपालिकेच्या सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा तर्फे पार पडलेल्या 'माय बोली साजिरी- मराठी मनाचा कॅनव्हास' हा संस्कृतीवर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोखले सभागृहामध्ये पनवेलकर रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती.  अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, खाद्य संस्कृती, पेहेराव संस्कृती, शस्त्रास्त्र संस्कृती हे व असे अनेक विषय ह्या अभिवाचनात्मक कार्यक्रमामध्ये मांडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज...

ग्रामपंचायत कुडगावमध्ये भ्रष्टाचार; चार ग्रामसेवकांचे निलंबन

 ग्रामपंचायत कुडगावमध्ये भ्रष्टाचार; चार ग्रामसेवकांचे निलंबन. श्रीवर्धन कोलमांडला / सोपान निंबरे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन कुडगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांनी केलेला भ्रष्टाचार उघड झाले असून यामध्ये चार ग्रामसेवक निलंबित तर संबंधित सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्यात आली असून संबंधित कनिष्ठ सहाय्यक तसेच विस्तार अधिकारी यांची खाते निहाय चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आले आहेत.  ग्रामपंचायतमधील होणाऱ्या भ्रष्टाचारांपैकी ही जिल्हा स्तरावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. प्राप्त माहितीनुसार या गैरव्यवहार प्रकरणी कुडगाव ग्रामस्थ निलेश मोहन पवार यांनी विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार सन २००९ ते २०१६ कालावधीतील कुडगाव ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारा बाबत सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी सादर केला होता. या अहवाला नुसार विभागीय आयुक्त यांनी रायगड जिल्हा परिषदेला नियमोचित कारवाही करण्याचे आदेश पारित केले होते. परंतु जिल्हा पर...

आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन 

आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन  लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण  आमदार महेश बालदी सुद्धा यात्रेकरूंसोबत यात्रेला  पनवेल(हरेश साठे) आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील १२५० आदिवासी बांधवांना २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मथुरा अयोध्या काशी या तीर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे.  त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरूंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.            यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्...

पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या निसर्ग पर्यटन आराखड्याच्या संदर्भात आज (दि. १९) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे वने मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक संपन्न झाली.

   पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या निसर्ग पर्यटन आराखड्याच्या संदर्भात आज (दि. १९) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे वने मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक संपन्न झाली. यावेळी उत्तम असा कर्नाळा पक्षी अभयारण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी देऊन आराखड्याबद्दल मार्गदर्शक सूचना संबंधित विभागाला दिल्या. यावेळी वन विभागाचे प्रमुख अधिकारी व तसेच कर्नाळा विभागातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर 

Image
    गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर     गावाचा विकास करा निधीची कमतरता पडणार नाही- आमदार महेश बालदी     कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जिंकायचीच- बाळासाहेब पाटील  पनवेल(हरेश साठे) भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. २४) येथे केले.        देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास म...

फेस्टिवल ऑफ ड्रीम्स कॅम्पेनमध्ये आकर्षक ऑफर्सची मेजवानी

पनवेल(प्रतिनिधी)  क्रोमाच्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्स ,  न्यू इयर सेल मध्ये आकर्षक ऑफर्सची मेजवानी मिळणार आहे. या निमिताने आनंदाने आणि उत्साहाने सरत्या वर्षाचा निरोप घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.       भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक सदस्य क्रोमाने उत्पादनांच्या सर्व श्रेणींमध्ये ग्राहकांच्या आवडीच्या गॅजेट्स व उपकरणांवर आकर्षक ऑफर्स सुरु केल्या आहेत. लॅपटॉप्स ,  मोबाईल फोन ,  घरगुती उपकरणे ,  टीव्ही आणि इतर अनेक उत्पादनांची खरेदी करण्याची आपली स्वप्ने पूर्ण करण्याची उत्तम संधी क्रोमामध्ये मिळत आहे. सुट्ट्यांच्या संपूर्ण सीझनमध्ये २ जानेवारी २०२३ पर्यंत क्रोमाच्या स्टोर्समध्ये आणि  croma.com   वर हा सेल सुरु राहणार आहे.          ख्रिसमस आणि नवे वर्ष या दोन्ही निमित्ताने भरपूर आनंद साजरा केला जातो.  ' सीक्रेट सांता '  खेळण्यापासून आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आवडीच्या भेटवस्तू खरेदी करण्यापर्यंत ग्राहकांच्या सर्व इच्छा ,  आकांक्षा ,  गरजा पूर्ण क...