Posts

पनवेल परिसरात हजारो श्री सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

नवेल परिसरात हजारो श्री सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम  नवीन पनवेल : थोर निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त दिनांक १ मार्च रोजी पद्मभूषण स्वच्छ्ता दुत आप्पा साहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर स्वचछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पनवेल शहरात देखील श्री सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालय, उड्डाणपुल, तलाव क्षेत्र, शहरातील सर्व रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. या मोहिमेत पनवेल, मार्केट परिसर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील साधारण 4 हजार 193 श्री सदस्यांनी स्वचछता मोहिमेत सहभाग घेतला होता.         1 मार्च  2023 रोजी ति. डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमीत्त  महास्वच्छता अभियान आयोजित  केलेले आहे .स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नविन पनवेल शहर, रेल्वेस्थानक...

स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष 

Image
  स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष  पनवेल(प्रतिनिधी) राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.          आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात म्हंटले कि, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादितील सवलतींचा कालावधी वाढवून देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी डिसेंबर २०२२ मध्ये वा त्यादरम्यान मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेल्यामुळे स्पर्धा परिक्षेस बसण्याची त्यांची संधी हुकली असल्याचे निदर्शनास आले आहे, असे असल्यास या  प्रकरणी शा...

अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली

  अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर सेक्टर १२ मधिल एका रो हाऊसवर छापा टाकून १ कोटी ७० लक्ष रूपयांचे गांजा, चरस, हेरॉईन व मेथाक्युलॉन हे अंमली पदार्थ दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी जप्त केले असून या प्रकरणी परदेशी नायजेरीयन नागरीकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विक्री व्यवसायात परदेशी नायजेरीयन नागरीकांचा मोठया प्रमाणात सहभाग सातत्याने दिसून येत असून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी स्थानबध्दता केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परदेशी तसेच व्हिसा संपलेल्या नागरीकांना त्यांच्या मुळ देशात परत पाठविण्याबाबत तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल करून या महत्वाच्या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले.    ...

मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी # मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने

  मराठी केवळ भाषा नव्हे ,  आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने   मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे ,  आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी ,  वाक्प्रचार ,  अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या.  मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी ,  ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे  मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ,  दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही  म्हणाले की ,  मराठी प्...

भाजपा, सांस्कृतिक सेल तर्फे आयोजित "माय बोली साजिरी" अभिवाचनात्मक आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध 

भाजपा सांस्कृतिक सेल तर्फे आयोजित "माय बोली साजिरी" अभिवाचनात्मक आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध  पनवेल(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्याने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगरपालिकेच्या सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा तर्फे पार पडलेल्या 'माय बोली साजिरी- मराठी मनाचा कॅनव्हास' हा संस्कृतीवर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोखले सभागृहामध्ये पनवेलकर रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती.  अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, खाद्य संस्कृती, पेहेराव संस्कृती, शस्त्रास्त्र संस्कृती हे व असे अनेक विषय ह्या अभिवाचनात्मक कार्यक्रमामध्ये मांडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज...

ग्रामपंचायत कुडगावमध्ये भ्रष्टाचार; चार ग्रामसेवकांचे निलंबन

 ग्रामपंचायत कुडगावमध्ये भ्रष्टाचार; चार ग्रामसेवकांचे निलंबन. श्रीवर्धन कोलमांडला / सोपान निंबरे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन कुडगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांनी केलेला भ्रष्टाचार उघड झाले असून यामध्ये चार ग्रामसेवक निलंबित तर संबंधित सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्यात आली असून संबंधित कनिष्ठ सहाय्यक तसेच विस्तार अधिकारी यांची खाते निहाय चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आले आहेत.  ग्रामपंचायतमधील होणाऱ्या भ्रष्टाचारांपैकी ही जिल्हा स्तरावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. प्राप्त माहितीनुसार या गैरव्यवहार प्रकरणी कुडगाव ग्रामस्थ निलेश मोहन पवार यांनी विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार सन २००९ ते २०१६ कालावधीतील कुडगाव ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारा बाबत सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी सादर केला होता. या अहवाला नुसार विभागीय आयुक्त यांनी रायगड जिल्हा परिषदेला नियमोचित कारवाही करण्याचे आदेश पारित केले होते. परंतु जिल्हा पर...

आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन 

आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन  लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण  आमदार महेश बालदी सुद्धा यात्रेकरूंसोबत यात्रेला  पनवेल(हरेश साठे) आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील १२५० आदिवासी बांधवांना २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मथुरा अयोध्या काशी या तीर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे.  त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरूंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.            यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्...