Posts

पिलाई कॉलेज पनवेल येथील अभिषेक केशव सूर्यवंशी या विद्यार्थ्याने संपादित केली इंजिनीरिंगची पदवी

Image
 पिलाई कॉलेज पनवेल येथील अभिषेक केशव सूर्यवंशी या विद्यार्थ्याने संपादित केली इंजिनीरिंगची पदवी  पनवेल (जितेंद्र नटे)       पनवेल येथील मुंबई विद्यापीठाचे महात्मा एजुकेशन सोसायटीचे पिल्लाई इंजिनिर कॉलेज मध्ये नुकताच दीक्षांत समारंभ पार पडला. या समारंभात अनेक विद्यार्त्यांना कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा एजुकेशन सोसायटीचे पिल्लाई कॉलेज असून पनवेल मध्ये नावाजलेल्या इंजिनीरिंग कॉलेजमधील एक मानले जाते.     या दीक्षांत समारंभामध्ये मूळचा परभणीच्या मात्र पनवेल येथे राहत असणाऱ्या अभिषेक केशव सूर्यवंशी या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविले आहे. त्याने म्यॅख्यानिकल इंजिनीरिंग मधून पदवी प्राप्त केली असून त्यामुळे संपूर्ण तालुक्यात तसेच पनवेल मध्ये त्याचे कौतुक करण्यात येत आहे. आपल्या मुलाने इंजिनीरिंग पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचे वडील केशव सूर्यवंशी आणि आई महानंदा केशव सूर्यवंशी यांना कमालीचा आनंद झाला आहे. मुलगा इंजिनीर व्हावा यासाठी आई वडिलांनी खूप मेहनत घेतली होती. प्रचंड मेहनत घेऊन मुलाने पदवी प्राप्त केल्य...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Image
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी       पनवेल(प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज(दि. ३० मार्च) खारपाडा टोल प्लाझा येथे केले.        कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी ४२. ३००कि.मी. आणि खर्च २५१. ९६  कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी १३ कि.मी. आणि खर्च १२६. ७३ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी ८. ६० कि.मी. आणि खर्च ३५. ९९ कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण ६३. ९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४. ६८ कोटी रुपये खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील खा...

माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

Image
  माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित  पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत यांना पालघर जिल्हयातील भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 'राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  विरार येथील भाऊसाहेब वर्तक सभागृहात झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मानाचा फेटा परिधान करून त्यांचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश भोईर, सचिव अंकुश भोईर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुशीला घरत यांना पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड असल्याने त्यांच्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रमे होत असतात. विविध प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून होत असते त्यामुळेच त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत ...

सीकेटी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट

Image
  सीकेटी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मार्गदर्शन  पनवेल(हरेश साठे)  तरुणांचे राष्ट्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बहुविध बिरुदे असणाऱ्या देशातील तरुणांमध्ये संसदीय लोकशाहीच्या मूल्यांचे रोपण करण्यासाठी तथा राज्यविधिमंडळाच्या विधीनिर्मिती प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स  अँड   सायन्स कॉलेज ,  न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राज्यशास्त्र विभागातील ४७ विद्यार्थी आणि ०२ प्राध्यापक यांच्या चमूने  सोमवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला भेट दिली.             महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ताफा दुपारी ०३ वाजता विधानमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी विद्यार्थ्यांनी काही वेळ विश्रांती व अल्पोपहा...

राज्याचा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

  पनवेल (प्रतिनिधी) राज्याचा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. त्याचबरोबरीने त्यांनी पनवेल, उरणसह रायगड जिल्हयाला पुढील काळात आवश्यक असलेल्या बाबींचा उल्लेख करत तशी मागणीही यावेळी केली.             अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रथम म्हंटले कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराला आदर्श म्हणून शिरोधार्य मानून या महाराष्ट्राचा या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान, ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीय आणि सर्व समाज घटकांचा विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरु आहे. एकीकडे शाश्वत शेती तर दुसरीकडे युवकांच्या हाताला काम देण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्राचा जो पंचतीर्थ असा अर्थसंकल्प मांडलाय त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री...

श्रीसंत तुकाराम महाराज रौप्यमहोत्सव बीज उत्साहात साजरी

Image
 श्रीसंत तुकाराम महाराज रौप्यमहोत्सव बीज उत्साहात साजरी श्रीवर्धन सोपान निंबरे; श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ मुंबई मंडळ व गणेश क्रिकेट मंडळ गालसुरे (कुणबी वाडी) यांचे सौजन्याने श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव व बीजचे औचित्य साधून श्री सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेली पंचिविस वर्ष तुकाराम महाराज बीज गालसुरे मध्ये साजरी केली जाते. यातून तालुक्यातील समाजामध्ये संत तुकाराम महाराजांचे विचार, शिकवण व परमेश्वराची भक्त्ती घडावी हा उद्धिष्ट घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला समाज तालुका अध्यक्ष रत्नकांत लांबाडे, उपाध्यक्ष बबन चाचले, जेष्ठ नारायण भोसले, लसू भाये, सीताराम साळवी, माजी सभापती बाबुराव चोरगे, मुंबई माजी अध्यक्ष बाळकृष्ण सोलकर, दशरथ कातकर, उपसरपंच दिलीप सालदुरकर,भांडारी समाज विठोबा देवकर, बौद्ध, कुंभार, समाजाचे अध्यक्ष तसेच, हरीचंद्र मलेकर, संदीप भात्रे तसेच तालुक्यातुन कुणबी समाज प्रमूख अध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्...

एका उद्योजिकेच्या हस्ते इतर उद्योजिका महिलांचा सन्मान.

Image
  एका उद्योजिकेच्या हस्ते इतर उद्योजिका महिलांचा सन्मान. उरण  (विठ्ठल ममताबादे ) "एक महिला उद्योजक बनली तर तिच्या मुळे इतर महिला देखील उद्योजिका होतात" या उक्तीप्रमाणे उरण मधील उद्योजिका पूनम पाटेकर यांनी ऑरगॅनिक  सॅनिटरी नॅपकिन्स चा तीन वर्षापूर्वी व्यवसाय चालू केला.पण हा एक व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्य म्हणून त्यांनी हा वसा  उचलला.आणि मोफत डेमो च्या माध्यमातून घराघरात,शाळा,सोसायटी,बचत गट ,महिलांचे आयोजित कार्यक्रमांमधून मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि काही महिलांनी देखील या कार्यात खारीचा वाटा उचलला आणि हा व्यवसाय करण्यास इच्छा दर्शवली आणि जोरदार पणे आपापल्या परीने व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली.त्यांच्या या कामाचे कौतुक आणि सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोखरण गल्ली, म्हातवली, उरण येथे सन्मान सोहळा पार पडला. पूनम पाटेकर यांनी तुळशीचे रोप देऊन उद्योजिका असलेल्या महिलांचा सन्मान केला.आणि त्यांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्...