Posts

समाजसेवक संजय तटकरे म्हणजे तरुण पिढीसाठी आदर्श.

Image
संजय तटकरे म्हणजे तरुण पिढीसाठी आदर्श. श्रीवर्धन (प्रतिनिधी) : आपण ही आपल्या देशाचे, समाजाचे काहीतरी देने लागतो. ही भावना आणि समज ज्याला आहे तो आपोआपच समाजसेवेकडे वळतो. म्हणजे देवच हे समाजकार्य करून घेत असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असाच एक जिंदा दिलाचा माणूस म्हणजे संजय तटकरे होय. गेली अनेक वर्षे आपल्याला जेवढे झेपेल तेवढे समाजकार्य करीत असतात. आपल्या स्थानिक गावी मंडळाचे ते 6 वर्षे अध्यक्ष आहेत. वावे पंचतन ग्राम विकास मंडळ अध्यक्ष म्हणून मंडळाच्या विकासामधे बराच योगदान त्यांनी दिलेले आहे. गावच्या विकासासाठी रस्ते, पाणी, वीज, या सुविधांसाठी ते नेहमीच आमदार, ग्रामपंचायत इथे पाठपुरावांकरून विकास कामे त्यांनी आणली आहेत. गेली कित्येक वर्ष दांडगुरी, नागळोली पंच क्रोशी मोबाईल सुविधा नव्हती शासनाकडे पाठ पुरावा करून 4 वर्ष पूर्वी देवखोल येथे बीएसएनएल टॉवर त्यांनी उभा केला. खुजारे ते कसरकोण्ड पंचक्रोशी विकास संघटनेची स्थापना करून पंच क्रोशीतल विकासकामासाठी दिवस रात्र झटत आहेत. बोर्ली विभाग गवळी समाज मुंबईचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत, समाजाच्या उन्नती साठी अथक प्रयत्न केले आहेत. गेले एक व...

रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव 

Image
रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव  सातारा (हरेश साठे) कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेला तब्बल ०८ कोटी ८६ लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेेेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज (मंगळवारी, दि. ०९) सातारा येथे कर्मवीर भूमीत समारंभपूर्वक हृद्य गौरव करण्यात आला.            रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील  यांचा ६४  वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. थोर देणगीदार  लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या ...

"श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पादुका दर्शन सोहळा"* श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन

Image
  "श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पादुका दर्शन सोहळा"* श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन  पनवेल :   13 मे 2023 शनिवार रोजी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिवस विविध सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.          सकाळी 6.00 वाजता पंचायतन मंदिरांमधील  पूजन आणि आरती करून 9.00 ते 11.00 या वेळेमध्ये कीर्तनाचार्य ह भ प श्री.पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांसाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे दर्शन श्री क्षेत्र पंचायतन मंदिर सभागृह येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00  वाजेपर्यंत असणार आहे. यादरम्यान  दुपारी 12.00 वाजता येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आणि संगीत चक्रीभजन महोत्सव आयोजित केलेले आहे. दुपारी 3.00 वाजता भजनसंध्याच्या आयोजनानंतर सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेमध्ये श्रींची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा व हरिपाठ झाल्यानंतर 7.00 वाजता संगीत भजन च्या माध्यमातून वर्ध...

राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे - लोकनेते रामशेठ ठाकूर

Image
राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे - लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल(हरेश साठे) राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. ०७ मे ) उलवा नोड येथे केले.            कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन  आत्माराम भगत यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२३" पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक पार पडला.  तत्पूर्वी शेलघर येथे भगत साहेब निवासस्थानी भगत साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यावेळी समारं...

पनवेलचे पत्रकार शंकर वायदंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव

Image
 पनवेलचे पत्रकार शंकर वायदंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव पनवेल - नवीन पनवेल भीम महोत्सव २०२३ दि. १६ एप्रिल रोजी  आयोजक नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्ध विहार, नवीन पनवेल रायगड यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शंकर वायदंडे यांना मा. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.  शंकर वायदंडे पत्रकार क्षेत्रात कार्य करत असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज या महापुरुषांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. तसेच समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण करून समाजहित जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते स्वत: झोपडपट्टी राहत असून झोपडपट्टी सुधारणा होईल, याचा विचार करीत कार्यक्रम राबवत असतात. पनवेलमधील सर्व सामाज घटकांना न्याय देण्याचे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून लोकांसाठी वेळोवेळी मदतीला जात आहेत. त्यांच्या या कार्याची दखत घेत बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार नवीन पनवेल रायगड यांच्या माध्यमातून आयोजक मा. नगरसेवक अ‍ॅड. प्रका...

महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या सविस्तर रायगड मधून – महाड जिल्हयाची हाेणार निर्मिती, ## श्रीवर्धन मतदार संघामध्ये हाेणार बदल

Image
  महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार ? 22 जिल्हे प्रस्तावित , जाणून घ्या सविस्तर रायगड मधून – महाड जिल्हयाची हाेणार निर्मिती, श्रीवर्धन मतदार संघामध्ये हाेणार बदल   रायगड मत (प्रतिनिधी) : राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात . कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे . 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं . अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते . मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली . त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले . मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो . त्यामुळे आता आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे . Raigadmat.page राज्यात पहिल्यांदा 26 जिल्हे होते ठाणे , कुलाबा ( आताचे रायगड ), रत्नागिरी , बृहन्मुंबई , नाशिक , धुळे , पुणे , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ), बीड परभणी , उस्मानाब...